13.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeआरोग्यमहाराष्ट्रातील १२५० रुग्णांना 'दगडूशेठ' तर्फे श्रवणयंत्र वाटप 

महाराष्ट्रातील १२५० रुग्णांना ‘दगडूशेठ’ तर्फे श्रवणयंत्र वाटप 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सह सूर्योदय फाऊंडेशन, ओएनजीसी तर्फे उपक्रम

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाऊंडेशन मुंबई व ओएनजीसी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील १२५० ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. सदाशिव पेठेतील फडके हॉल पुणे येथे तीन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले. राज्यासह पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातून ज्येष्ठ नागरिक व मुले या शिबीराकरिता आली होती.यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शिबीरात ४५० ज्येष्ठ नागरिक व ८०० लहान मुलांना श्रवणयंत्र देण्यात आले. आजपर्यंत अनेक रुग्णांना यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. केवळ पुण्यातच नाही, तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरुनच समाजातील मोठी व्यथा समोर येत असल्याचे दिसून आले आहे. या शिबीरात बार्शी, सोलापूर, धाराशिव यांसह इंदापूर, बारामती, आंबेगाव, जुन्नर, मंचर, भोर, वेल्हा, पिंपरी-चिंचवड आदी भागातील ज्येष्ठ नागरिक व मुलांचा सहभाग होता.ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले,  मुलांना ऐकायला येत नसेल तर ती केवळ ऐकू शकत नाहीत, असे नाही तर यामुळे अनेक मुले बोलायला देखील शिकत नाहीत. त्यामुळे याकडे लक्ष देऊन श्रवणयंत्र विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लहान मुलांना ऐकायला येत नाही, हे पालकांना लवकर कळत नाही. त्यामुळे याविषयी जनजागृती करण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जी मुले आर्थिकदृष्टया दुर्बळ आहेत, त्यांना विनामूल्य श्रवणयंत्र दिले जात आहे. तसेच ज्येष्ठांनाही मोफत यंत्र देण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
76 %
0kmh
0 %
Wed
19 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!