34.8 C
New Delhi
Friday, July 4, 2025
Homeआरोग्यसार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यात अव्वल

सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यात अव्वल

आरोग्य व्यवस्थापन, मातृ व बाल संगोपन आणि लसीकरणात आघाडी; ९२ गुणांसह ठरली राज्यातील सर्वोत्कृष्ट महानगरपालिका

पिंपरी – : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन आणि माहिती प्रणाली (HMIS) अहवालानुसार राज्यातील महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालात १ एप्रिल २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ पर्येंतच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे.

सार्वजनिक health आरोग्याच्या विविध निकषांवर, विशेषतः कुटुंब कल्याण, मातृ व बाल संगोपन, तसेच नियमित लसीकरण कार्यक्रम यामध्ये पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने प्रसारित केलेल्या जानेवारी २०२५ च्या अहवालानुसार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने ९२ गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे.

सार्वजनिक आरोग्य सेवांमधील उत्तुंग कामगिरी

महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी अनेक प्रभावी उपक्रम राबवले आहेत. यामध्ये मातृ व बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत गरोदर माता नोंदणी, १२ आठवड्यांपूर्वी प्रसूतीपूर्व नोंदणी, गरोदर मातांचे लसीकरण आणि आयएफए (IFA) गोळ्यांचे वितरण यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. तसेच बाल आरोग्य सेवांच्या अंतर्गत नवजात बालकांची नोंदणी प्रभावीपणे झाली आहे. नियमित लसीकरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांचे नियोजन, तसेच पीपीआययूसीडी (Postpartum Intrauterine Contraceptive Device) बसवण्याचे प्रमाण वाढवण्यावर भर, गरोदर महिलांसाठी उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवण्यावर भर देणे, या सारख्या विविध उपक्रमांचाही यामध्ये समावेश आहे.

राज्यातील आघाडीच्या महानगरपालिका

पिंपरी-चिंचवड – ९२ गुण (प्रथम क्रमांक)

कोल्हापूर – ८८ गुण (द्वितीय क्रमांक)

सोलापूर – ८८ गुण (तृतीय क्रमांक )

नवी मुंबई – ८८ गुण ( चतुर्थ क्रमांक)

सांगली – ८७ गुण (पाचवा क्रमांक)

पुणे – ८७ गुण ( सहावा क्रमांक)

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पुढील योजना

महानगरपालिका प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहेत. त्यामध्ये बर्न वॉर्ड, कॅन्सर हॉस्पिटल, आपला दवाखाना, डिजिटल हेल्थ सोल्यूशन्स, आरोग्य केंद्रे डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीशी जोडणे, स्मार्ट हेल्थ ट्रॅकिंग, नागरिकांच्या आरोग्य डेटाचे डिजिटल विश्लेषण, महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांचा विस्तार, झोपडपट्टी व दुरवरच्या भागात नवीन आरोग्य केंद्रे सुरू करणे, लसीकरण आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमांना अधिक गती, लसीकरण कव्हरेज १०० टक्के करण्याचे उद्दिष्ट, मातृ व बाल आरोग्यासाठी अतिरिक्त योजनांचा आराखडा अशा योजनांचा समावेश आहे.

कोट
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनास राज्यपातळीवर प्रथम क्रमांक मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे यश मिळाले आहे. भविष्यात अधिक व्यापक आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी आम्ही सातत्याने विविध उपक्रम राबवण्यावर, उपाययोजना करण्यावर भर देत आहोत.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका

कोट

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनात राज्यात अव्वल स्थान मिळवणे, ही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी मोठी उपलब्धी आहे. नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा देण्यावर आमचा कायम भर राहील. भविष्यात डिजिटल आरोग्य व्यवस्थापन, आधुनिक आरोग्य केंद्रे आणि व्यापक लसीकरण कार्यक्रमांच्या माध्यमातून आरोग्यसेवा आणखी बळकट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनात राज्यपातळीवर प्रथम क्रमांक मिळवणे, ही अभिमानाची बाब आहे. वैद्यकीय विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सतत नव्या उपक्रमांची रचना आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाले. भविष्यात आरोग्य सेवा आणखी सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.

  • डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
34.8 ° C
34.8 °
34.8 °
54 %
2.9kmh
43 %
Fri
36 °
Sat
41 °
Sun
37 °
Mon
31 °
Tue
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!