29.1 C
New Delhi
Tuesday, June 17, 2025
Homeआरोग्य"भारतातील पहिले एआय डायलिसिस मशीन"

“भारतातील पहिले एआय डायलिसिस मशीन”

किडनी रुग्णांसाठी उपचार आता अधिक सुलभ आणि परवडणारे

पुणे : मूत्रपिंडाच्या आजारांवरील उपचार अधिक सुलभ आणि परवडणारे करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत, रेनलिक्स हेल्थ सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडने जगातील पहिले पूर्णपणे स्वदेशी, एआय आणि क्लाउड-सक्षम स्मार्ट हेमोडायलिसिस मशीन ‘रेनलिक्स-आरएक्सटी २१’ सादर केले आहे. हे यंत्र केवळ ६.७० लाख रुपयांपासून उपलब्ध असून, आयात केलेल्या यंत्रांच्या तुलनेत हे किंमतीत आणि कार्यक्षमतेत अधिक लाभदायक आहे.

रेनलिक्स-आरएक्सटी २१ हे रिमोट मॉनिटरिंग, क्लिनिकल कनेक्टिव्हिटी, क्लाउड-आधारित टेलिनेफ्रॉलॉजी प्लॅटफॉर्म, एआय अल्गोरिदम, ईएमआर इंटिग्रेशन, रिअल-टाइम टेलीमेट्री आणि आयओएमटी (Internet of Medical Things) क्षमतांसह सुसज्ज आहे. यामुळे डॉक्टरांना रुग्णांची माहिती, डायलिसिस सेटिंग्ज आणि उपचार इतिहास थेट आणि त्वरित मिळू शकतो, ज्यामुळे उपचार अधिक प्रभावी आणि सुरक्षित होतात.

या यंत्रामुळे भारतातील एंड-स्टेज रीनल डिसीज (ईएसआरडी) रुग्णांसाठी डायलिसिस सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागातील उपचारांची दरी भरून काढण्याचा रेनलिक्सचा उद्देश आहे. कंपनीने पुढील चार वर्षांत ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून ५,००० यंत्रांची उत्पादन क्षमता निर्माण करण्याची योजना आखली आहे. २०२७-२८ पर्यंत ही क्षमता १,५०० यंत्रांनी वाढवली जाणार आहे.

रेनलिक्स-आरएक्सटी २१ हे युरोपियन युनियनच्या सीई प्रमाणपत्रासह भारतातील पहिले आणि जगातील सहावे प्रगत डायलिसिस यंत्र ठरले आहे. भारतीय सीडीएससीओ मान्यता अंतिम टप्प्यात असून, अमेरिकन एफडीए मंजुरीही मार्च २०२६ पर्यंत अपेक्षित आहे.

कंपनीच्या उत्पादन सुविधा कर्नाटकातील बेंगळुरू, म्हैसूर आणि महाराष्ट्रातील मुंबई येथे आहेत. भारतासह दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि युरोपमध्येही रेनलिक्सने यंत्र निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. पुढील तीन वर्षांत घरगुती डायलिसिस मॉडेलसह तांत्रिकदृष्ट्या प्रगत यंत्रांची नवी श्रेणी बाजारात आणण्याचा कंपनीचा मानस आहे.

रेनलिक्सने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला (BEL) पुढील तीन वर्षांत ६,००० ‘रेनलिक्स-आरएक्सटी १७’ यंत्रांच्या उत्पादनासाठी परवाना दिला आहे. आरएक्सटी १७ हे यापूर्वी सादर केलेले डायलिसिस यंत्र असून, त्याचा वापर ग्रामीण भागात सुलभ आणि परवडणाऱ्या डायलिसिस सेवांसाठी केला जात आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमानुसार, भारतात दरवर्षी सुमारे २.२० लाख नवीन ईएसआरडी रुग्ण नोंदवले जातात आणि ३.४ कोटी डायलिसिस सत्रांची गरज असते. अशा वेळी, रेनलिक्स-आरएक्सटी २१ आणि आरएक्सटी १७ ही यंत्रे किडनी रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत.

रेनलिक्सचे संस्थापक व संचालक डॉ. श्याम वासुदेव राव यांच्या मते, “हे अत्याधुनिक हेमोडायलिसिस यंत्र भारतासह जागतिक आरोग्यसेवेत क्रांती घडवेल. डायलिसिस सेवा रुग्णांच्या घराजवळ आणून आणि खर्च ४०% पर्यंत कमी करून, आम्ही ‘मेक इन इंडिया – मेक फॉर द वर्ल्ड’ या दृष्टिकोनातुन जगभरातील किडनी रुग्णांसाठी उपचार सुलभ करू.”

कंपनीने स्थानिक सेवा पथके, तंत्रज्ञ प्रशिक्षण आणि फ्रँचायझी केंद्रांच्या माध्यमातून संपूर्ण भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या यंत्रांचा वेगाने विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
रेनलिक्स-आरएक्सटी २१ मुळे किडनी रुग्णांसाठी उपचार आता अधिक आधुनिक, सुरक्षित, सुलभ आणि परवडणारे होणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
29.1 ° C
29.1 °
29.1 °
63 %
1.4kmh
100 %
Mon
29 °
Tue
33 °
Wed
39 °
Thu
41 °
Fri
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!