– विधायक उपक्रमातून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजापुढे आदर्श
पिंपरी-चिंचवड –
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबीर दि. 22 जुलै 2025 रोजी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा संकल्प करून विधायक उपक्रमाचा आदर्श नागरिकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी या निमित्ताने सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध विधायक उपक्रम राबवले जात आहेत यामध्ये वृक्षारोपण दिव्यांग बांधवांना मदत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप यांसारख्या अनेक उपक्रमांचा समावेश आहे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये रक्त संकलन करण्याचा उद्देश ठेवून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
**
रक्तदान शिबिरामध्ये चिखली-कृष्णानगर
विठ्ठल मंदिर, यादव नगर, कुदळवाडी. (9175483030), तळवडे-यमुनानगर हनुमान मंदिर, रुपीनगर मेन रोड, रुपीनगर (8483918918), ठाकरे मैदान, यमुनानगर (9822517144), मोशी-चऱ्होली, निलेश बोराटे जनसंपर्क कार्यालय, देहू रस्ता, मोशी (7610787878, 9518727934), वाघेश्वर महाराज क्रीडांगण, चऱ्होली बुद्रुक (9822926000),दिघी-गवळीनगर-गव्हाणे वस्ती विठ्ठल मंदिर, दिघी गावठाण, दिघी (9822804402) विदर्भ मित्र मंडळ, दिघी रोड भोसरी (7447435970) प्रभू रामचंद्र सभागृह, गव्हाणे वस्ती (9689222444) या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रक्तदात्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
**
प्रतिक्रिया
पावसाळा संपल्यानंतर जलजन्य आजारातून उद्भवणाऱ्या अनेक आजारांमुळे रक्ताची गरज पडते याशिवाय वाढते अपघात अनेक शस्त्रक्रिया यांसाठी देखील गरजूंना रक्ताची आवश्यकता भासते. अशावेळी रक्ताचा तुटवडा उद्भवू नये यासाठी अनेक संस्थांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर भरवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयांमध्ये दररोज शेकडो रुग्ण शहर तसेच शहराच्या लगतच्या भागातून येत असतात. आर्थिक दुर्बल असणाऱ्या या घटकांना अनेकदा रक्ताची गरज भासते. त्यामुळे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्याचा मानस आहे. हा संकल्प याही पुढे सुरू राहणार आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.