24.1 C
New Delhi
Monday, October 27, 2025
Homeआरोग्यमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये महा रक्तदान शिबिर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये महा रक्तदान शिबिर

२३२१ रक्त पिशव्यांचे विक्रमी संकलन; शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची माहिती

पिंपरी-चिंचवड- : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात काल, २२ जुलै रोजी आयोजित ३० भव्य महा रक्तदान शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजप शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. श्री. काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिरांमधून एकूण २३२१ रक्त पिशव्यांचे विक्रमी संकलन करण्यात आले.
आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबीरे घेण्यात आली. यावेळी माजी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, दक्षिण आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, भाजपा सरचिटणीस विजय शिंदे, अजय पताडे, महिला शहराध्यक्ष सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, मंडल अध्यक्ष मोहन राऊत, हर्षद नढे, सोमनाथ तापकीर, गणेश ढोरे, सनी बारणे, जयदीप खापरे, धरम वाघमारे, मंगेश धाडगे, अनिता वाळुंजकर, रामदास कुटे, ऍड. योगेश सोनवणे, शिवराज लांडगे, अमोल डोळस, अजित बुर्डे यांच्यासह स्थानिक नगरसेवक, भाजप पदाधिकारी, विविध प्रकोष्ठ प्रमुख उपस्थित होते.

श्री. काटे यांनी शहरातील नागरिकांना आणि युवकांना या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन केले होते आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या शिबिरांमध्ये महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्वच स्तरांतील लोकांनी उत्साहाने सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

ही रक्तदान शिबिरे चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा क्षेत्रातील विविध प्रमुख ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रावेत – वाल्हेकर वाडी, चिंचवड, काळेवाडी, थेरगाव – वाकड, थेरगाव चौक, रहाटणी – पिंपळे सौदागर, रहाटणी, सांगवी – पिंपळे गुरव, पिंपळे गुरव, प्राधिकरण – चिंचवड, आकुर्डी गाव – शाहू नगर, सं.तु.नगर – खराळवाडी – कासारवाडी, फुगेवाडी – दापोडी – बोपखेल, चिखली – कृष्णानगर, रुपीनगर, तळवडे – यमुनानगर, मोशी – चहोली, चहोली बुद्रुक, दिघी – गवळीनगर गव्हाणे वस्ती, लांडगे वस्ती आणि मोशी प्राधिकरण, नेहरूनगर या ठिकाणांचा समावेश होता. तिन्ही विधानसभा संघातील भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष, विविध पदाधिकारी तसेच अन्य सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला.

यावेळी बोलताना, श्री. शत्रुघ्न काटे यांनी “रक्तदान हीच खरी समाजसेवा असून, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समाजाभिमुख कार्याला मानवंदना म्हणून आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, आणि प्रत्येक रक्तदाता ही प्रेरणा आहे!” असे आवाहन पिंपरी चिंचवड शहरवासियांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. यामध्ये विशेषतः तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता, तर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मागे न राहता या सामाजिक कार्यात सक्रिय योगदान दिले.

या शिबिरासाठी चाकण रक्तपेढी संस्थांचे वैद्यकीय पथक उपलब्ध होते. तसेच, रक्तदात्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व उपाययोजना व सुविधा शिबिरस्थळी करण्यात आल्या होत्या. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी दाखवलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद असल्याचे श्री. काटे यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
24.1 ° C
24.1 °
24.1 °
64 %
2.1kmh
40 %
Mon
32 °
Tue
30 °
Wed
32 °
Thu
30 °
Fri
31 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!