31.1 C
New Delhi
Thursday, September 18, 2025
Homeआरोग्यफॅशन शो च्या निमित्ताने शहरातील शाळकरी मुलींना सॅनिटरी पॅड वाटप

फॅशन शो च्या निमित्ताने शहरातील शाळकरी मुलींना सॅनिटरी पॅड वाटप

चिंचवड : कशिश सोशल फाउंडेशन महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असते, यामध्ये दुर्गम, झोपडपट्टी भागातील महिला मध्ये मासिक पाळी जनजागृती, सॅनिटरी पॅड वाटप सातत्याने केले जाते. आज रायझिंग स्टार आणि मिस, मिस्टर, मिसेस इंडिया ग्लोबल फॅशन शोच्या निमित्ताने शहरातील शाळकरी मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.

एलप्रो मॉल,चिंचवड येथे कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्स च्या वत्तीने रायझिंग स्टार मिस / मिसेस / मिस्टर 2025 या फॅशन शोचे आयोजन केले होते. हा फॅशन शो मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यामध्ये शंभराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार,डॉ केतन जोगळेकर,आई फाउंडेशनच्या सई वढावकर, शो ची ब्रँड ॲम्बेसेडर मनस्वी नायडू, कशिश प्रॉडक्शन्स चा ब्रँड ॲम्बेसेडर ओम जगदाळे, विशेष सहकार्य लीना मोदी, पूर्णिमा लुणावत, सपना भावे, स्मिता मधुकर, अर्चना मघाडे, डॉ. स्मिता बरावकर, सई तपकीर,अदिती तुडवेकर, अंजली वाघ,ज्युरी पूजा वाघ, प्रियंका मिसाळ, प्राजक्ता साळवी आदि मान्यवर उपस्थित होते.

या अनोख्या फॅशन शो विषयी बोलताना योगेश पवार म्हणाले, आपल्या सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्स च्या वत्तीने हा फॅशन शो आयोजित केला होता. आम्ही महिलां मध्ये स्वच्छता, मासिक पाळी आदीं बाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करत असतो. मागील वर्षी काश्मीरच्या खोऱ्यात भारत – पाक सीमे लगतच्या गावांमध्ये आम्ही भारतीय सैन्यांच्या मदतीने आमचा उपक्रम राबविला होता, त्यावेळी सैन्याचे कार्य अगदी जवळून अनुभवता आले होते.

विजेते : दुर्वा पाटील,आरुष शिंदे,ईशा दिहिंगिया,समरवीर,मंजु भाषिनी,नयना कालेकर,मेधा जोशी,रोहित राठोड

उपविजेते: स्वरा बोरोले,सान्वी गारगोटे,शिवतेज शिंदे,संस्कार पाटील,उन्नती घाटोळे, हर्षिका राठोड, विहान गुरव, सौरांश सराफ, अमिषा अमारे,ऐश्वर्या बायस,ज्योती वाघ,अंकिता पाईकराव,नम्रता पठारे,वनिता राठोड,रोहित वडीले,अक्षय मुलुंजकर

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
62 %
0kmh
20 %
Thu
33 °
Fri
38 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!