12.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeआरोग्यकरोना नियंत्रणात; पुण्यात अजित पवारांची आढावा बैठक, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

करोना नियंत्रणात; पुण्यात अजित पवारांची आढावा बैठक, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “सध्यातरी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सर्व काही नियंत्रणात असून घाबरण्याचे कारण नाही. मात्र नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.”

राज्यातील करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार राज्यात 102 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्येनं 1,914 वर झेप घेतली आहे. आतापर्यंत 25 मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिका क्षेत्रात 26 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 5 रुग्ण आढळले आहेत.

अजित पवार म्हणाले, “सर्वात जास्त रुग्ण केरळमध्ये आहेत, पण महाराष्ट्रातही वाढ होतेय. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, सिव्हिल सर्जन, डीएचओ आणि दोन्ही महानगरपालिकांच्या आरोग्य विभागांसह विभागीय आयुक्तांची संयुक्त बैठक घेतली असून आवश्यक सूचना दिल्या आहेत.”

करोनाच्या काळातील 2020 चे दिवस आठवत अजित पवार म्हणाले, “तेव्हा दर आठवड्याला बैठक घेत होतो आणि सर्व यंत्रणांना जबाबदारी सोपवून काम केले. आता पुन्हा तशीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.”

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरही सातत्याने स्थितीवर लक्ष ठेवत असून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत नियमित आढावा घेतला जातो, अशी माहिती पवार यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, “ज्येष्ठ नागरिक, ज्यांना सर्दी, खोकला, शिंक येत आहे, त्यांनी नॅपकिनचा वापर करावा. विशेषतः वयोवृद्धांनी अधिक काळजी घ्यावी. जनतेने घाबरून न जाता सजग राहावे.

NEWS TITLE- “COVID Under Control in Pune: Ajit Pawar Reviews Situation, Urges Citizens to Stay Cautious”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
12.1 ° C
12.1 °
12.1 °
82 %
0kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
22 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!