भविष्यातील आरोग्यदायी शहरासाठी मोशीमध्ये मेडीसिटी (PMC Medical Hub) प्रकल्प प्रस्तावित; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
पिंपरी-चिंचवड – उद्योगनगरी आणि मेट्रो सिटी म्हणून ओळखले जाणारे पिंपरी-चिंचवड आता ‘मेडीसिटी’ प्रकल्पाच्या दिशेने पुढे सरकत आहे. उत्तम वैद्यकीय सुविधा, संशोधन संस्था आणि शिक्षण केंद्रे या माध्यमातून या शहराला नवी आरोग्यदायी ओळख मिळणार आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी या (Mahesh Landge Medcity Project
)महत्त्वाकांक्षी योजनेचा ठोस पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे औपचारिक मागणी केली आहे.
शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, भौगोलिक स्थान आणि वाहतुकीसाठी असलेली उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी पाहता पिंपरी-चिंचवड ‘आरोग्य केंद्र’ म्हणून विकसित होण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
📍 प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि स्थानिक गरज
- मोशी परिसरात पीएमआरडीएच्या जागेवर मेडीसिटी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव
- उत्तर पुणे जिल्ह्याला वैद्यकीय शिक्षण व उपचारासाठी नवसंजीवनी
- एकाच ठिकाणी मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल्स, संशोधन केंद्रे, मेडिकल कॉलेजेस
- शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सहज उपलब्ध सुविधा
- भविष्यातील ‘फ्युचर सिटी’ म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख निर्माण
🗣️
“मेडीसिटी प्रकल्प शहराच्या वैद्यकीय क्षेत्राला नवा आकार देईल. संशोधन, शिक्षण व उपचार यांचे केंद्र होऊन पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्याला याचा लाभ होईल. आम्ही हा प्रकल्प प्रत्यक्षात यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहोत.
– आ. महेश लांडगे