25.3 C
New Delhi
Sunday, August 24, 2025
Homeक्रीड़ाकीर्ती'च्या माध्यमातून मिळणार खेळाडूंना संधी

कीर्ती’च्या माध्यमातून मिळणार खेळाडूंना संधी

'एमआयटी एडीटी' विद्यापीठात २२ ते २५ जून दरम्यान खेलो इंडिया क्रीडा निवड

पुणे – संपूर्ण पश्चिम भारतातील युवा क्रीडा प्रतिभेला वाव देण्याच्या उद्देशाने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) वतीने येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणे, येथे 22 ते 25 जून 2024 या कालावधीत खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन (कीर्ती ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम, विविध क्रीडा प्राकारांमध्ये भविष्यातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेवून त्यांचे पालनपोषण करण्याच्या दिशेने भारत सरकारचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
‘एमआयटी एडीटी’ विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख प्रा.डाॅ.सुराज भोयार, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा विभाग संचालक प्रा.पद्माकर फड यांचे व्यवस्थापन व मार्गदर्शनाखाली आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमाद्वारे बॅडमिंटन आणि बॉक्सिंग (२२ जून), ॲथलेटिक्स (२३ जून), फुटबॉल आणि खो-खो (२४ जून) तर कबड्डी आणि व्हॉलीबॉल (२५ जून) या क्रीडा प्रकारांसाठी खेळाडूंचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्रथम, सामान्य भौतिक मापदंडांचे मूल्यांकन करणे, त्यानंतर प्रत्येक खेळ प्रकारासाठी तयार केलेले क्रीडा-विशिष्ट मूल्यमापन करणे अशा दोन टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडेल. या मुल्यांकनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टॅलेंट असेसमेंट सेंटरकडून (टीएमसी) त्यांच्या कामगिरीचे तपशीलवार प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येईल. या चाचणीतून उत्तीर्ण झालेल्या प्रतिभांना खेळाडूंना उच्च स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रम जसे की खेलो इंडिया ॲथलीट्स (कीया) मध्ये निवडले जाण्याची संधी प्राप्त होणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ. मंगेश कराड यांनी भारत सरकारचे आभार मानले. ते म्हणाले, एमआयटी एडीटी विद्यापीठ कायमच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देते, ज्यात क्रीडा क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. एक चांगला खेळाडू तण, मन आणि चारित्र्याने संपन्न असतो, तोच भविष्यात राज्यासह देशाचे नाव उज्वल करतो. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यातील प्रतिभावान खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखविण्याचे व्यासपीठ मिळवून देवू शकल्याचा नक्कीच अभिमान आणि तितकाच आनंद आहे.
भारत सरकारच्या या चार दिवसीय निवड चाचणी कार्यक्रमात राज्यातील युवा व प्रतिभावान खेळाडूंनी आवर्जून भाग घ्यावा, व नोंदणीसाठी श्री. सुनील मोरे यांच्याशी ९७६३३९८१३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
79 %
3.2kmh
18 %
Sun
31 °
Mon
31 °
Tue
35 °
Wed
37 °
Thu
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!