मुंबई-पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल २०२४चा ५३वा सामना धरमशालामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सला २८ धावांनी हरवले. रविवारी धरमशाला येथे एचपीसीए स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात यजमान पंजाब संघाला विजयासाठी १६८ धावांचे आव्हान मिळाले होते.
याचा पाठलाग करताना पंजाबचा संघाला ९ विकेटमध्ये १३९ धावा करता आल्या. ॠतुराज गायकवाडच्या नेतृत्वाती सीएसकेचा ११ सामन्यांतील हा सहावा विजय आहे. तर ते पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्सचा हा ११ वा सामन्यातील सातवा पराभव आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा हिरो रवींद्र जडेजा ठरला. त्याने ऑलराऊंडर कामगिरी केली. जडेजाने आधी ४३ धावा केल्या. त्यानंतर तीन विकेट घेतल्या. पंजाब किंग्सकडून फलंदाजीत प्रभसिमरन सिंह आणि शशांक सिंह यांनी कमाल केली. प्रभसिमरनने ३० आणि शशांक सिंहने २७ धावा केल्या. चेन्नईकडून जडेजाशिवाय सिमरजीत सिंह आणि तुषार देशपांडेने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली. दोन्ही वेगवान गोलंदाजांनी दोन दोन विकेट घेतल्या.
खातेही खोलू शकला नाही धोनी
सामन्यात टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना चेन्नई सुपर किंग्सने ९ बाद १६७ धावा केल्या. सीएसकेसाठी रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४३ धावा केल्या. जडेजाने २६ बॉलमध्ये आपल्या खेळीदरम्यान तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. कर्णधार ॠतुराज गायकवाडने ३२ आणि डेरिल मिचेलने ३० धावा केल्या. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी खातेही खोलू शकला नाही. पहिल्या बॉलवर बाद झाला. त्याला हर्षल पटेलने क्लीन बोल्ड केले. पंजाबसाठी हर्षल पटेल आणि राहुल चाहरने तीन-तीन विकेट घेतल्या. तर अर्शदीपला दोन बळी मिळवण्यात यश मिळाले.
पंजाबचा विजयी सिक्सर हुकला
चेन्नईने २८ धावांनी चारली पराभवाची धूळ
New Delhi
few clouds
29.2
°
C
29.2
°
29.2
°
78 %
3.2kmh
18 %
Wed
37
°
Thu
39
°
Fri
38
°
Sat
35
°
Sun
35
°