24.4 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeक्रीड़ापीसीपी चे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न

पीसीपी चे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न


पिंपरी, -क्रीडा क्षेत्रासह कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य, एकाग्रता, ध्येय निश्चिती आणि समर्पण भावनेने दिलेले शंभर टक्के योगदान या चतुसूत्रीचा वापर करावा असा गुरु मंत्र खो-खो चे राष्ट्रिय प्रशिक्षक अरविंद करवंदे यांनी दिला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी भारतीय खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे, प्रसिद्ध पार्श्वगायिका राधा खुडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, उद्यान विभागाचे योगेश वाळुंज, रेडिओ जाॅकी अक्षय, पीसीबीच्या प्राचार्य डॉ. विद्या बॅकोड, पीसीईटीचे सोशल मीडिया प्रमुख डॉ. केतन देसले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मनोज वाखारे, क्रीडा विभाग प्रमुख सुनील जगताप, राजू गायकवाड, पीसीपी चे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व निवृत्त कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये पार्श्वगायिका राधा खुडे हिने देखील यांनी “पाटलाचा बैलगाडा” आणि “पाव्हनं जेवलात का” ही गाणी सादर करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे रानजाई महोत्सव, वृक्षारोपण स्पर्धा असे उपक्रम राबविले जातात. यामध्ये विद्यार्थी व पालकांनी स्वयं स्फूर्तीने सहभागी होऊन शहरात पर्यावरण व स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी आवाहन उमेश ढाकणे यांनी केले.
पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या प्राचार्या डॉ. विद्या बॅकोड यांनी पीसीईटीच्या विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली पीसीपी मध्ये वर्षभर विद्यार्थी केंद्रित अनेक उपक्रम राबवले जातात याबाबत माहिती दिली.
प्रा. मनोज वाखारे व प्रा. सुनील जगताप यांनी यांनी वार्षिक क्रीडा स्पर्धा व उपक्रमांची माहिती दिली. यावर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये तसेच अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या खेळाडूंचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पीसीइटी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलनाच्या शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
24.4 ° C
24.4 °
24.4 °
46 %
1.8kmh
0 %
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!