29.2 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeक्रीड़ापुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित सायकल रॅली स्तुत्य उपक्रम: मा. मुरलीधर मोहोळ

पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित सायकल रॅली स्तुत्य उपक्रम: मा. मुरलीधर मोहोळ

बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे हडपसर येथे दिमाखात उदघाटन

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीकडे विशेष लक्ष दिलेले आहे. त्यामुळे दादांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळवून देणारी पुणे ते बारामती सायकल स्पर्धा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत देशाचे सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित पुणे ते बारामती सायकल रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे सहकार मंत्री मा. दिलीप वळसे पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम, माजी उपमहापौर मा. दिपक मानकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, एशियन सायकलिंग फेडरेशनचे महासचिव ओंकार सिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आयोजित होणाऱ्या पुणे ते बारामती सायकल रॅलीची संकल्पना स्पष्ट करत या स्पर्धेच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नावर जनजागृती करण्याचा प्रयत्न पुणे जिल्हा शिक्षण मंडळ करत असल्याचे नमूद केले.

उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करत असताना महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. दिलीप वळसे पाटील यांनी सदर सायकल स्पर्धेच्या आयोजनासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल संस्थेचे कौतुक केले.

याप्रसंगी उपस्थित सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांचा उत्साह द्विगुणीत केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शनिवारवाडा येथून हिरवा झेंडा दाखवत या सायकल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये आंध्र प्रदेश, सेना दल, वायुदल, अंदमान व निकोबार, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, रेल्वे अशा देशाच्या विविध भागातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले असून बारामती येथे या स्पर्धेचा समारोप होणार आहे.

या सायकल रॅलीच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व कार्यालयीन कर्मचारी, संस्थेशी संलग्नित सर्व शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले असून निरोगी आरोग्य व विविध सामाजिक संदेश देणाऱ्या या सायकल रॅलीच्या आयोजनाबद्दल सर्व स्तरातून पुणे जिल्हा शिक्षण मंडळावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे हडपसर येथे दिमाखात उदघाटन

हडपसर येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलीम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे उदघाटन हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू अल्ट्रा मॅन दशरथ जाधव यांच्या शुभहस्ते फ्लॅग फडकवून झाले.

या प्रसंगी आमदार चेतन तुपे, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, रा.कॉ. पक्ष महारष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर वैशाली बनकर, माजी नगरसेवक सुनिल बनकर, हडपसर रा.कॉ. अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, हडपसर रा.कॉ. कार्याध्यक्ष अमर तुपे, माजी नगरसेवक मारुती तुपे, मा. नगरसेवक फारूक इनामदार, माजी नगरसेवक शिवाजी पवार, महिला अध्यक्ष वैष्णवी सातव, पल्लवी होले, नम्रता बोदर, दीपाली झेंडे, विजया भोसले, अश्विनी वाघ, आयर्न मॅन डॉ. योगेश सातव, आयर्न मॅन डॉ. रश्मी सातव, आयर्न मॅन डॉ. योगेश गायकवाड, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा.श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव मा.श्री. एल.एम. पवार, तसेच सायकल असोसिएशनचे प्रतापराव जाधव, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे , प्राचार्य अशोक भोसले, प्राचार्य आर. व्ही. पाटील, प्राचार्य नितीन सावळे, प्राचार्य सचिन भारद्वाज, प्राचार्य आश्विनी शेवाळे, प्राचार्य रंजना पाटील, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे प्रा. प्रीतम ओव्हाळ, प्रा. अनिल दाहोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला.दरम्यान ढोल पथक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जागोजागी सायकलपटूंचे जल्लोषात स्वागत करत प्रोत्साहन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंजुषा भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अनिल जगताप यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
29.2 ° C
29.2 °
29.2 °
78 %
3.2kmh
18 %
Wed
37 °
Thu
39 °
Fri
38 °
Sat
35 °
Sun
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!