23.7 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeक्रीड़ारोहित शर्मावरुन सगळाच गोंधळ

रोहित शर्मावरुन सगळाच गोंधळ

, मार्क बाऊचर पंचांना भिडले, अखेर हार्दिकची मध्यस्थी

कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलमधील ६० वी मॅच ईडन गार्डन्स वर पार पडली. या मॅचमध्ये केकेआरनं मुंबईवर १८ धावांनी विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ विकेटवर १५६ धावा केल्या होत्या. केकेआरची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्मावरुन अम्पायरचा गोंधळात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. रोहित शर्माला सध्या मुंबई इंडियन्सकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात स्थान दिलं जातंय. गेल्या काही मॅचेसपासून रोहित फक्त फलंदाजीसाठी मैदानात उतरतो. मात्र, रोहित शर्मा फील्डिंगसाठी मैदानावर उतरला आणि पंचांचा गोंधळ उडाला.
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामॅचमधील हा प्रसंग सर्वांच्या लक्षात राहािला. मुंबई इंडियन्स टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.गेल्या काही मॅच प्रमाणं रोहित शर्माला मुख्य टीममध्ये स्थान देण्याऐवजी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून स्थान देण्यात आलं होतं. मात्र, पियूष चावलानं त्याच्या ओव्हर पूर्ण केल्यानंतर तो मैदानाबाहेर निघून गेला आणि रोहित शर्मा सब्स्टीट्यूट म्हणून मैदानवर आला. यानंतर पियूष चावला मैदानात आला. रोहित शर्मा देखील मैदानावरच होता. यानंतर खऱ्या गोंधळाला सुरुवात झाली.
रोहित शर्माची फील्डिंग करत होता. मात्र, यावेळी तो पियूष चावलाचा सब्स्टीट्यूट नाही तर नुवान तुषाराचा सब्स्टीट्यूट बनला होता. मात्र, पंचांना ही बाब लक्षात आलेली नव्हती यावरुन वादाला सुरुवात झाली.
 रोहित शर्मा, पियूष चावला आणि नुवान तुषारा यांच्यातील अदलाबदल पंचांच्या लक्षात आली नाही. पंचांचा गोंधळ झाला. पंचांना रोहित शर्मा हा सबस्टीट्यूट फील्डर म्हणून आलाय की इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलाय हे अद्याप समोर आलं नव्हतं. यानंतर मार्क बाऊचर चौथ्या पंचांसोबत वाद घालताना दिसून आला.
अखेर हार्दिक पांड्यानं या सर्व प्रकरणात मध्यस्थी केली आणि रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवलं. जोपर्यंत फील्डिंग टीम त्यांच्या इम्पॅक्ट प्लेअरची घोषणा करत नाही तोपर्यंत कोणताही खेळाडू सब्स्टीटयूट म्हणून मैदानावर उतरु शकतो.
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेला पराभव यंदाच्या आयपीएलमधील नववा पराभव ठरला. दुसरीकडे केकेआरनं मुंबई इंडियन्सचा पराभव करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. मुंबई इंडियन्सची आता शेवटची मॅच लखनौ सुपर जाएंटस सोबत होणार आहे. त्यामध्ये त्यांना विजय मिळवता येतो का ते पाहावं लागणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
23.7 ° C
23.7 °
23.7 °
37 %
3.4kmh
0 %
Thu
30 °
Fri
31 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!