पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन (MSCA) आणि इंडियन माउंटनिअरिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयएफएससी आशियाई के चॅम्पियनशिप २०२५’ सध्या पिंपळे सौदागर येथे सुरू आहे. या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड वासियांनी लहान मुलांचा चढाईचा थरारक खेळ अनुभवला. ही अवघड चढाई करताना प्रत्येक खेळाडूंचा कस लागत होता. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कोरिया व जपानच्या मुलांनी आपले वर्चस्व सिद्ध करत बाजी मारली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पीसीएमसी क्लाइंबिंग वॉलवर होत असलेल्या या स्पर्धेत आशियातील १३ देशांतील २०० हून अधिक खेळाडूंनी सहभागी झाले आहेत. दरम्यान ही स्पर्धा ४ नोव्हेंबर पर्यंत योगा पार्क, पिंपळे सौदागर येथे सुरू आहे.
दुसऱ्या दिवसाचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
१५ वर्षांखालील मुलींची – बौल्डर स्पर्धा
या गटात जपान आणि कोरिया यांच्या खेळाडूंनी  वर्चस्व गाजवले.
सुवर्णपदक – हारू माकिता (जपान) हिने ८४.९ गुणांसह पटकावले.
रौप्य पदक – नाना किमुरा (जपान)
कांस्य पदक – नो युन सिओ (कोरिया)
तर भारताच्या अमियरा खोसल्ला हिने १२ वे स्थान मिळवले. तसेच शरयू हांडे (२२ वे) आणि सांगिता तियु (२५ वे) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
१५ वर्षांखालील मुलं – बौल्डर स्पर्धा
या गटातही कोरियन आणि जपानी खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.
सुवर्णपदक – जुंगयून चोई (कोरिया)
रौप्यपदक – को ह्विचान (कोरिया)
कांस्यपदक – कोटारो कावामोटो (जपान)
भारताच्या सुकू सिंग याने आठव्या क्रमांकासह टॉप-१० मध्ये स्थान मिळवले. देबाशीष महतो (१५ वे) आणि इतर भारतीय खेळाडूंनीही उत्तम प्रदर्शन केले.
१३ वर्षांखालील मुलं – लीड स्पर्धा
या गटात कोरियन खेळाडूंनी सर्व पदके जिंकत वर्चस्व राखले.
सुवर्णपदक – जुनह्योक को (कोरिया)
रौप्यपदक – लिम सिह्युन (कोरिया)
कांस्यपदक – वाँग युएत शिंग राफेल (हाँगकाँग)
भारतीय मोरा बुरियुली (७ वे) आणि शंकर सिंह कुंतिया (८ वे) यांनी दमदार कामगिरी करत देशाचे नाव उंचावले.
१३ वर्षांखालील मुली – लीड स्पर्धा
या गटात कोरियन मुलींनी शानदार कामगिरी केली.
सुवर्णपदक – किम हायउन (कोरिया) सुवर्णपदक
रौप्यपदक – पार्क हायुल (कोरिया)
कांस्यपदक – ली जियुन (कोरिया)
भारताची ध्रुवी पदवाल हिने ८ वे स्थान मिळवून विशेष लक्ष वेधले. मनीषा हांसदा आणि मीरा चौधरी यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत चांगले स्कोअर मिळवले.


