सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा ; पुणे नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या वतीने आयोजन
पुणे : गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर जनता सहकारी बँकेच्या संघाने पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतरसहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेत सन्मित्र सहकारी बँकेवर दहा ग़डी राखून सहज मात केली.
नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. सन्मित्र सहकारी बँकेला प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ८ षटकांत ८ बाद २६ धावाच करता आल्या. सन्मित्र च्या फलंदाजांना जनता सहकारी बँकेच्या संघाच्या गोलंदाजांनी फटकेबाजीची संधीच दिली नाही. त्यामुळे सन्मित्र बँकेच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या रचता आली नाही.

सन्मित्रचा संघ ३० धावांचा टप्पाही ओलांडू शकला नाही. हे छोटेखानी लक्ष्य जनता सहकारी बँकेच्या अनुप मेरगू आणि वेदान्त मराठे या सलामी जोडीने २.२ षटकांत सहज साध्य केले. ‘सन्मित्र’च्या गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही. अनुपने नाबाद १३, तर वेदान्तने नाबाद १० धावा केल्या.
धावफलक
सन्मित्र सहकारी बँक – ८ षटकांत ८ बाद २६ (नितीन लोहार ७, तुषार दिवटे २-१, उदय जांभळे १-२, संजय मिशी १-४) पराभूत वि. जनता सहकारी बँक – २.२ षटकांत बिनबाद २७ (अनुप मेरगू नाबाद १३, वेदान्त मराठे नाबाद १०). सामनावीर – देण्यात आलेला नाही.
राजर्षी शाहू सहकारी बँक – ८ षटकांत ७ बाद ६८ (रोहन बलकवडे १९, प्रशांत सुपेकर ७, सुमीत गावडे ३-९, गोपाळ मुंडे १-१२, अनिकेत तुपे १-२२) वि. वि. साधना सहकारी बँक – ७.४ षटकांत सर्व बाद ४४ (अनिकेत तुपे १६, गोपाळ मुंडे ९, वैभव पायगुडे ३-५, अजय मोरे ३-९, दीपक वैराट १-१२, प्रशांत सुपेकर १-१२, रोहन बलकवडे १-५). सामनावीर – वैभव पायगुडे.
धर्मवीर संभाजी अर्बन बँक – ८ षटकांत ८ बाद ३६ (संजय रानमाळे १२, सचिन कडू ७,कैलास शिंदे ३-१२, योगेश वाघ २-६, रोहित कडू १-२, सचिन तनपुरे १-४) पराभूत वि. संत सोपानकाका सहकारी बँक – ३.१ षटकांत १ बाद ३७ (कृणाल गरुड नाबाद १६, राहुल जगताप ११, सचिन कडू १-१४). सामनावीर – कृणाल गरुड.
प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत ६ बाद ४७ (संपत गुजर १०, वैभव दसरे नाबाद १०, अक्षय पवार २-९, तुषार नांदे २-९, अजित सुरवसे २-४) पराभूत वि. पीडीसीसी – ५.१ षटकांत २ बाद ४८ (शार्दूल शिंदे नाबाद १८, संतोष बानपट्टे नाबाद १६, प्रवीण बंडोळे १-७, सोपान भंडारे १-१०). सामनावीर – अक्षय पवार.


