23.7 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeक्रीड़ापहिल्या 'खेलोत्सव पॅरा एडिशन - २०२५' स्पर्धांचा दिमाखदार समारोप

पहिल्या ‘खेलोत्सव पॅरा एडिशन – २०२५’ स्पर्धांचा दिमाखदार समारोप

अवनी लेखरा, दीपक सैनी आणि खुशबू यांची चमकदार कामगिरी

पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे ११ ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या पहिल्या ‘खेलोत्सव पॅरा एडिशन – २०२५’ मध्ये भारतातील पॅरा नेमबाजांनी दमदार कामगिरी केली. भारतात पहिल्यांदाच पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व एजीसी स्पोर्ट्स व पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलोत्सव पॅरा एडिशन – २०२५’ क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ५० आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू व देशभरातून ६०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते.

या प्रसंगी पद्मश्री मुरलीकांत पेटकर,द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त पॅराशूटिंग चेअरपर्सन आणि प्रेसिडेंट पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया चे जयप्रकाश नौटियाल ,जीवनगौरव शिव छत्रपती पुरस्कारप्राप्त शकुंतला खटावकर, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज चे कार्यकारी संचालक अजय मुकुंद जगताप,कामेश मोदी,संजय शेंडगे,प्रतीक मोडक,किरण कानडे,किरण लोहार आदि मान्यवर उपस्थित होते.

नौटीयाल म्हणाले, सर्व सहभागी खेळाडूंनी या स्पर्धेत रंगत आणली, सर्व पदक विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. स्पर्धेत अनेक नवीन राष्ट्रीय विक्रम झाले आहेत. आर्यन्स ग्रुपचे मी सर्वांच्या वतीने शिस्तबद्ध आयोजनाबद्दल आभार मानतो.

समारोप प्रसंगी बोलताना आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज चे कार्यकारी संचालक अजय मुकुंद जगताप म्हणाले, एजीसी स्पोर्ट्स च्या माध्यमातून आम्ही विविध क्रीडा प्रकारांना आणि स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहान देण्याचे काम करत आहोत. खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ च्या निमिताने राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवरील खेळांशी, खेळाडूनशी आम्ही जोडले गेले आणि स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकलो याचा आनंद आहे.

स्पर्धेचा सारांश पुढीलप्रमाणे –

पॅरालिम्पिक विजेती अवनी लेखरा (राजस्थान) हिने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत १० मी. एअर रायफल स्टँडिंग महिला SH1 आणि ५० मी. रायफल थ्री पोजिशन महिला SH2 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

दीपक सैनी (हरियाणा) हा स्पर्धेतील तारा ठरला. त्याने १० मी. एअर रायफल स्टँडिंग पुरुष SH1 आणि १० मी. एअर रायफल प्रोन मिक्स्ड SH1 या दोन सुवर्णपदकांवर मोहोर उमटवली.

उत्तर प्रदेशची खुशबू हिने रायफल SH2 प्रकारात दोन सुवर्णपदक जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले.

पिस्तुल प्रकारात निहाल सिंह (राजस्थान) याने १० मी. एअर पिस्तुल पुरुष SH1 आणि २५ मी. पिस्तुल मिक्स्ड SH1 सुवर्ण पटकावले. तर टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मनीष नरवाल (हरियाणा) याने ५० मी. पिस्तुल मिक्स्ड SH1 मध्ये सुवर्ण जिंकले. सुमेधा पाठक (उत्तर प्रदेश) हिने १० मी. एअर पिस्तुल महिला SH1 सुवर्ण पटकावले.

तरुण गटात नवोदित खेळाडूंनीही चमक दाखवली. काविन केंगनळकर (महाराष्ट्र) याने १० मी. रायफल स्टँडिंग ज्युनियर स्पर्धेत सुवर्ण जिंकले. रुद्रांश खंडेलवाल (राजस्थान) याने पिस्तुल प्रकारात प्रभावी कामगिरी केली, तर व्ही. मनोज कुमार (तामिळनाडू) याने ज्युनियर गटात पदके मिळवली.

संघ स्पर्धेत राजस्थानच्या नेमबाजांनी वर्चस्व राखत पुरुष आणि महिला पिस्तुल प्रकारात सुवर्णपदके जिंकली. तर आर्मी आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनीही दमदार कामगिरी केली.

या स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक विजेत्यांसह नव्या पिढीतील नेमबाजांनीही चमकदार कामगिरी करून देशातील पॅरा स्पोर्ट्सचे उज्ज्वल भविष्य अधोरेखित केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
23.7 ° C
23.7 °
23.7 °
37 %
3.4kmh
0 %
Thu
30 °
Fri
31 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!