20.1 C
New Delhi
Wednesday, December 17, 2025
Homeज़रा हट केअनाथ मुलांनी केली पुण्याची सफर

अनाथ मुलांनी केली पुण्याची सफर

पुणे : माऊली अनाथ आश्रम निराधार सेवा संस्था ट्रस्ट,नसरापूर येथील ६० हून आधिक अनाथ मुलांनी आज पुण्याची सफर करत ऐतिहासिक पुणे शहराचा वारसा समजून घेतला.निमित्त होते सोपान मोरे फाउंडेशनच्या वतीने आयोजित एक दिवाशिय पुणे दर्शन सहलीचे.

नसरापुर येथून आलेल्या या अनाथ विद्यार्थ्यांनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या दर्शनाने आपल्या सहलीची सुरुवात केली. त्यांनंतर लाल महाल मध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला,शनिवार वाड्याला भेट देऊन शहराचा ऐतिहासिक वारसा समजावून घेतला. यासोबतच शिवाजीनगर येथील एव्हीएशन गॅलरी मध्ये जाऊन विमानांचा इतिहास आणि तंत्रज्ञान लघुपटच्या व लघुरूपांच्या माध्यमातून समजून घेतले. याशिवाय या मुलांनी पुणे मेट्रोच्या प्रवासाचाही आनंद लुटला. तसेच पू. ल. देशपांडे उद्यान (ओकोयाम गार्डन) येथे या सहलीचा समारोप झाला. 

या उपक्रमविषयी बोलताना सोपान मोरे फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड ऋतुराज मोरे म्हणाले,आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबावत असतो, यामध्ये रक्तदान शिबिर,वृक्ष रोपण,थंडी मधे गरजूना स्वेटर वाटप,अनाथ मुलांसाठी सहली व अन्य उपक्रमांचा  समावेश आहे.

नवनाथ महाराज लिमण यांच्या माऊली अनाथ आश्रम निराधार सेवा संस्था ट्रस्ट ,नसरापूरला आम्ही काही दिवसांपूर्वी भेट दिली होती, त्यामुळे या मुलांना पुण्याची सफर घडविण्याचे आम्ही ठरवले.आज ६० हून अधिक मुले या सहलीसाठी पुण्यात आली होती, त्यांना पुण्याचा ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक ठेवा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला.या उपक्रमात नवनाथ महाराज लिमण यांच्यासह सौरभ  कुलकर्णी, अक्षय गायकवाड, युवराज मोरे, शेखर नागापूरे,शुभम शिंदे यांच्यासह पुणे मेट्रो कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभाल्याचे मोरे यांनी सांगितले. गेट सेट ट्रॅव्हलच्या सहकार्याने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते,तसेच भविष्यात अनाथ मुलांसाठी भविष्यात महाराष्ट्र बाहेरील सहल काढण्याचा मानस ॲड ऋतुराज मोरे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
56 %
3.6kmh
24 %
Wed
27 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!