पिंपरी : १८२७ पासून परंपरा, शुद्धता, विश्वास,पारदर्शकता,नाविन्यता या पंचसूत्रांवर आधारित विश्वास संपादन केलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांच्या चऱ्होली सुवर्ण दालनाचा भव्य, शानदार शुभारंभ शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०. ३० वाजता वर्ल्ड प्राईड सिटी चे मॅनेजिंग डायरेक्टर मा. अरविंद जैन व चंदुकाका सराफ ज्वेल्स् चे संचालक श्री अतुल जिनदत्त शहा, सौ. संगीता अतुल शहा यांच्या हस्ते व श्री. सिध्दार्थ अतुल शहा, श्री.आदित्य अतुल शहा, सौ. स्वीटी बागी,साहस बागी, संतोष शहा , मितेश शहा व अन्य मान्यवरांच्या उपस्थीतीत ड्रीम्स कार्निव्हल प्लॅटिनम बिल्डिंग , पुणे आळंदी रोड ,चऱ्होली फाटा येथे संपन्न झाला.
सकाळ पासूनच चऱ्होलीकरांनी दागिने खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार चंदुकाका सराफ ज्वेल्स् च्या वतीने श्री अतुल शहा, श्री. सिध्दार्थ अतुल शहा, श्री. आदित्य अतुल शहा यांनी केला.
उद्घाटनानिमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांनी दिनांक ३ जानेवारी ते ५ जानेवारी या कालावधीत अनेक ऑफर्स उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये रुपये १९,०००/- पासून पुढील दागिने खरेदीवर ट्रिपल धमाका मेगा ड्रॉ ऑफर मध्ये ३ स्कूटर, ३ लॅपटॉप, ३ मोबाईल व अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार असून सोबत ५००० रुपयांच्या पुढील योजनेतील गुंतवणुकीवर हमखास भेटवस्तू मिळणार आहे.
यावेळी बोलताना श्री. अतुल शहा म्हणाले की, चऱ्होलीमध्ये सुरू होणारी चंदुकाका सराफ ज्वेल्स् ची ही सोळावी शाखा आहे. शुद्ध सोने, माफक घडणावळ, चांदीचा शुद्धतेनुसार दर, परंपरा व नाविन्याचा मेळ साधणारी सोने व हिरेजडीत दागिन्यांची आकर्षक डिझाइन्स, लाईटवेट दागिन्यांची भरपूर व्हरायटी अशी विशेष वैशिष्ट्ये असणार्या या पेढीने ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून यशस्वी निरंतर वाटचाल केली आहे. ग्राहकांच्या याच पाठिंब्यामुळे आज
चऱ्होलीत चंदुकाका सराफ ज्वेल्स् ची शाखा सुरू होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या विशेष उद्घाटन समारंभ व योजनांचा लाभ समस्त चऱ्होलीकरांनी घेवून दागिने खरेदी करा असे आवाहन संचालक श्री. सिद्धार्थ शहा यांनी
केले आहे.
चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या चऱ्होली सुवर्ण दालनाचा शानदार शुभारंभ संपन्न
RELATED ARTICLES
New Delhi
fog
10.1
°
C
10.1
°
10.1
°
100 %
0kmh
18 %
Wed
22
°
Thu
22
°
Fri
23
°
Sat
23
°
Sun
21
°