32.8 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeज़रा हट केद स्काय इस अ बिलिफ’ डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन

द स्काय इस अ बिलिफ’ डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन

नववी मध्ये शिकणारी सिध्दा पांडे हीचे पहिले पुस्तक


पुणे : प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचं स्थान हे अतिशय मोलाचं असतं. विद्यार्थी अवस्थेत प्रत्येकाच्या आयुष्ताला पहिला गुरू म्हणजे त्याचे शिक्षक. शिक्षकांमध्ये मित्रत्वाच नात आजच्या विद्यार्थ्यांना हवं आहे. हाच मुख्य धागा पकडून इयत्ता नववी मध्ये शिकणार्‍या सिध्दा मिलिंद पांडे या विद्यार्थिनीने ‘द स्काय इज अ बिलिफ’ हे डिजिटल स्वरूपातील पहिले पुस्तक प्रकाशित केले आहे.
लहान मुलांसाठी आवडीचे सर्जनशील व्यासपीठ असलेल्या ‘ब्रायबुक’ या फ्लॅटफॉर्मवर हे डिजिटल स्वरूपातील पुस्तक उपलब्ध आहे. इंग्रजी भाषेतील १०८ पानांचे हे पुस्तक काल्पनिक कथेवर आधारित आहे. न्यू इंडिया स्कुल येथे नववी मध्ये शिकणार्‍या सिध्दा पांडे ही एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे यांची कन्या आहे.
पुस्तका संदर्भात सिध्दा पांडे म्हणाली,”लहानपणापासून मला लिहिण्याची आवड होती. मी कविता पण लिहिते. या आवडीमुळेच झाले पाहिले पुस्तक डिजिटल स्वरूपात आणतांना खूप आनंद होत आहे.”
या पुस्तकात नाती आणि मैत्री ही केवळ आपल्या वयोगटातील लोकांशीच नाही तर कुणाशीही होऊ शकते. या कथेमध्ये विद्यार्थी आपल्या शिक्षकांबरोबर मैत्री करून आयुष्यातील अमुल्य धडे मिळवण्याची आशा बाळगतो. या मैत्रीमध्ये विद्यार्थीच शिक्षकांचा मार्गदर्शक बनतो. नात्यात मोकळेपणा आला असला तरी त्यातला आदर मात्र ते कायम राखून आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
32.8 ° C
32.8 °
32.8 °
61 %
3.8kmh
26 %
Wed
37 °
Thu
39 °
Fri
38 °
Sat
35 °
Sun
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!