28.7 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeज़रा हट केधनेश्वर मंदिरात महादेवाच्या पिडींवर चंदनाचा लेप

धनेश्वर मंदिरात महादेवाच्या पिडींवर चंदनाचा लेप

 चिंचवड- चिंचवड शहरातील प्राचीन धनेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीला चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. चिंचवड येथे असलेलं धनेश्वर मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वैशाख महिन्यात महादेवाला चंदनाचा लेप लावण्यात आला. चिंचवडमधील प्राचीन धनेश्वर मंदिरात वैशाख महिन्याचं औचित्य साधून मंदिरात रंगबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.फुलांची आरास देखील करण्यात आली. मंदिर परिसर सकाळपासूनच भाविकांनी फुलून गेला आहे. धनेश्वर हे आठशे वर्षांपूर्वीचं मंदिर असल्याचे सांगितले जाते.

वैशाख महिन्यात उन्हाचा कहर असतो. नागरिकांना उन्हाचा चटका बसतो आहे. याच उष्णतेपासून देवाला दूर ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर चंदनाचा लेप लावला जातो. ज्यामुळे थंड वाटेल अशी आख्यायिका आहे. गुरुवारी त्याच श्रद्धेने महादेवाचे भक्त पिंडिपुढे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी करत आहेत. मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला असून महाप्रसाद वाटप करण्यात आला.

चिंचवड गावातील प्राचीन मंदिर
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28.7 ° C
28.7 °
28.7 °
78 %
4.6kmh
97 %
Mon
29 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!