पुणे: पुण्यातील वाहतूक कोंडी अद्याप कमी झालेली नाही. त्यासाठी एकेरी वाहतूक केली गेली आहे. तसेच मेट्रो pune metro देखील पुण्यात सुरू करण्यात आली आहे. असे, असतांना देखील प्रचंड वाहतूक कोंडीचे शहर म्हणून पुणे देशातच नाही तर जगात तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. टॉम टॉम ट्रॅफिक रिसर्च या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात कोलकता हे देशातील पाहिले, बेंगळुरू हे दुसरे आणि पुणे हे सर्वाधिक वाहतूक असलेले तिसऱ्या क्रमांकाचे शहर बनले आहे. २०२३ मध्ये पुणे यात सातव्या क्रमांकावर होते.पुणे शहरातील वाहतूक कोंडीची चर्चा नेहमी होत असते. या वाहतूक कोंडीमुळे pune traffic पुणे शहरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नवीन उड्डण पूल उभारले गेले आहेत.
भारतातील सर्वात मोठ्या गर्दीचे आणि वाहतुकी कोंडी होणाऱ्या शहरात जगात पुणे चौथ्या तर भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. यात दुसऱ्या स्थानावर बंगलोर तर पहिल्या क्रमांकावर कोलकता शहराचा समावेश आहे. २०२३मध्ये देखील पुणे सर्वाधिक वाहनांचे शहर होते. त्यानंतर आता २०२४ च्या टॉमटॉमरिसर्चचा अवाहलात पुणे वाहतूक कोंडीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचे शहर बनले आहे. पुण्यात १० किमी अंतर कपण्यासाठी तब्बल ३३ मिनिटांचा वेळ लागतो.
डच लोकेशन टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट टॉमटॉम यांनी जारी केलेल्या ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्टनुसार, कोलकातामध्ये १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी सरासरी ३४ मिनिटे आणि ३३ सेकंद लागतात. तर बेंगळुरूमध्ये ३४ मिनिटे आणि १० सेकंद लागतात. पूर्वीच्या अहवालात बेंगळुरू हे भारतातील सर्वात जास्त वाहतूक कोंडीचे शहर मानले जात होते, परंतु २०२४ मध्ये कोलकाता यादीत पुदधे आले आहे.२०२४ मध्ये, कोलकातामध्ये वाहनांचा सरासरी वेग फक्त १७.४ किलोमीटर प्रति तास होता. जो भारतातील सर्वात कमी वेग होता. बेंगळुरूमध्ये हा वेग ताशी १७.६ किमी होता. तर, पुण्यात १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी ३३ मिनिटे आणि २२ सेकंद लागतात.जागतिक स्तरावरही कोलकाता दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बेंगळुरू आणि पुणे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. कोलंबियातील बॅरनक्विला शहराला जगातील सर्वात संथ गतीचे शहर घोषित करण्यात आले, जिथे वाहने सरासरी १०.३ मैल प्रति तास वेग एवढा आहे.
हैदराबाद, चेन्नई आणि मुंबईसारख्या शहरांमधील वाहतूक परिस्थिती देखील चिंताजनक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या शहरांमध्ये सरासरी १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी ३२, ३० आणि २९ मिनिटे लागतात. तर दिल्लीत हा वेळ तुलनेने कमी आहे, दिल्लीत १० किमी आंतर कापण्यासाठी फक्त २३ मिनिटे लागतात.
टॉमटॉमचे वाहतूक विभागाचे उपाध्यक्ष राल्फ-पीटर शेफर यंचयानुसार वाहतूक कोंडीचे मुख्य कारणे म्हणजे जुने रस्ते, अव्यवस्थित शहरी नियोजन आणि वाढते शहरीकरण, वाढते वाहन. या अहवालात म्हटले आहे की, चांगले रस्ते, पायाभूत सुविधा, स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि सार्वजनिक वाहतुकीचा व्यापक वापर करून ही समस्या मोठ्या प्रमाणात सोडवता येऊ शकते.