27.3 C
New Delhi
Tuesday, August 26, 2025
Homeज़रा हट केविंटेज कार व बाईक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, मतदार जनजागृतीसाठी देशातील पहिलाच अनोखा...

विंटेज कार व बाईक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, मतदार जनजागृतीसाठी देशातील पहिलाच अनोखा प्रयोग

 

*पिंपरी, – : पिंपरी,चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे याबाबत जनजागृती रण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात पहिल्यांदाच  “भव्य विंटेज कार आणि बाईक रॅली व प्रदर्शनाचे” आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ऐतिहासिक दुर्मिळ कार व बाईक्स पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल  विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शनिवारी सायंकाळी संत तुकारामनगर येथील एच.ए. मैदानावर विंटेज कार आणि बाईक्स चे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी कार व बाईक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.  महापालिकेच्या वतीने भरविण्यात आलेल्या विंटेज कार प्रदर्शनाचा हेतू मतदार जनजागृती करून शहरातील मतदानाचे प्रमाण वाढावे, हा असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी मांडले. मतदान करणे हे लोकशाहीतील मतदारांचे आद्य कर्तव्य असल्याचे देखील ते म्हणाले. यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, रमेश डाळिंबे, देवेंद्र मोरे, अॅड अनंत पाटील, किसन केंगले, अभिजित डोळस, विकास गायकांबळे, ओंकार पवार, श्रेयश जाधव, पियुष घसिंग, सचिन महाज, महापालिकेचे कर्मचारी यांच्यासह विंटेज कार व बाईकधारक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, कोकणे चौक पिंपळे सौदागर येथून या विंटेज कार व बाईक रॅलीची सुरुवात अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून करण्यात आली. या रॅलीचा समारोप एच.ए.मैदानावर झाला व प्रदर्शनाला सुरुवात झाली.  विंटेज कार व बाईक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमल्याचे चित्र पाहायला मिळाले. तत्पूर्वी, जीएनडी ग्रुपच्या कलाकारांनी आपल्या नृत्याच्या माध्यमातून उपस्थितांना मतदान करण्याचे आवाहन केले. तर प्रतिभा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आणि ज्येष्ठ कलाकारांनी मतदार जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी मतदान करण्याबाबत शपथ घेतली.यावेळी मतदार जनजागृतीसाठी शहरातच नाहीतर देशात पहिल्यांदाच विंटेज कार प्रदर्शन भरविण्यात आले असल्याचे मत उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.  

नागरिकांना आवरेना सेल्फी काढण्याचा मोह

विंटेज कार प्रदर्शनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी लहान मुले, तरुणांसह ज्येष्ठांना देखील सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

विंटेज कार रॅली चित्रीकरणासाठी नागरिक रस्त्याच्या कडेला

कोकणे चौक ते एच.ए. मैदान या मार्गावरून विंटेज कार रॅलीचा प्रवास झाला. या  रॅलीचे चित्रीकरण करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्याच्या कडेला उभे होते. काही नागरिकांनी चित्रीकरणासाठी रॅलीमध्ये सहभाग घेऊन चित्रीकरण करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नागरिकांकडून महापालिकेचे आभार

स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते अलीकडील काळातील ऐतिहासिक व दुर्मिळ विविध फियाट मॉडेल्स सह विविध कंपन्यांचे दुर्मिळ कार पाहण्याची संधी नागरिकांना महापालिकेने उपलब्ध करून दिली. यामध्ये फियाट बलीला १९३५, फियाट मिलीसिंटो १९५५, फियाट सिलेक्ट१९६०, फियाट सुपर सिलेक्ट १९६२, फियाट प्रेसिडेंट१९७५, फियाट प्रीमियर पद्मिनी१९८०, ११८ एनइ आदी बहुसंख्य  कार व बाईक्स आदींचा समावेश होता. दुर्मिळ कार व बाईक्स  प्रत्यक्ष  पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय असून त्यासाठी महापालिकेचे  आभार, तसेच आम्ही मतदान करणार असून सर्व मतदारांनी आपला मताचा हक्क बजवावा असे आवाहन देखील प्रदर्शनात सहभागी झालेल्या नागरिकांनी केला.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
27.3 ° C
27.3 °
27.3 °
88 %
3.7kmh
100 %
Mon
27 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!