18.1 C
New Delhi
Tuesday, February 10, 2026
Homeज़रा हट केबालगंधर्व कलादालनात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा उत्सव

बालगंधर्व कलादालनात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा उत्सव

१३० विद्यार्थ्यांच्या कलाकृतींनी सजले बालगंधर्व कलादालन

डिजिटल युगातही हातातील पेन्सिल महत्त्वाची – शेखर साने

पुणे – विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने शैला प्रदीप सिन्नरकर यांच्या ‘रेग्युलर ड्रॉईंग क्लासेस’मधील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे भव्य प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे  भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार शेखर साने यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या उपसंचालक प्रा. डॉ. प्रणिता रानडे उपस्थित होत्या. कार्यक्रमास शेकडो विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.उद्घाटनप्रसंगी बोलताना चित्रकार शेखर साने म्हणाले की, डिजिटल युगामुळे आजच्या चित्रकारांना अभूतपूर्व संधी उपलब्ध झाल्या आहेत. एका क्लिकवर जगभरातील कला, संदर्भ व प्रेरणा मिळत असली तरी कलाकारांनी आपल्या मूळ निरीक्षणशक्तीला विसरता कामा नये. निसर्ग, माणसं आणि प्रत्यक्ष अनुभव हेच कलाकारांचे खरे गुरू असून केवळ स्क्रीनवर आधारित कला मर्यादित ठरू शकते. सातत्यपूर्ण स्केचिंग, मैदानी अनुभव आणि मेहनत कलाकाराला अधिक समृद्ध बनवते.यावेळी प्रा. डॉ. प्रणिता रानडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी अत्यंत सर्जनशील व दर्जेदार काम सादर केले आहे.

पालकांनी मुलांची आवड व कल ओळखून त्यांना योग्य दिशेने प्रोत्साहन द्यावे. ड्रॉईंग, डिझाईन व आर्किटेक्चर सारख्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण सराव अत्यंत आवश्यक आहे. मोबाईलच्या अतिवापराऐवजी कला जोपासल्यास मुलांचा एकाग्रता व कल्पकता निश्चित वाढते.शैला सिन्नरकर यांनी माहिती दिली की, हे प्रदर्शन ३ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ८.३० या वेळेत पुणेकरांसाठी विनामूल्य खुले आहे. यावर्षी प्रदर्शनात १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून ‘पाणी वाचवा’, ‘पृथ्वी वाचवा’, ‘सेव्ह टायगर’, सोशल मीडियाबाबत जागरूकता, व्यसनमुक्ती, भारतीय सैन्याचा अभिमान, झाडे वाचवा असे सामाजिक संदेश देणारी चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. यासोबतच पोर्ट्रेट्स, कॅनव्हास पेंटिंग, कॉफी पेंटिंग, म्यूरल्स, निसर्गचित्रे, पेन्सिल शेडिंग व स्थिरचित्रे पाहायला मिळत आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुजबळ यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
18.1 ° C
18.1 °
18.1 °
72 %
1.5kmh
0 %
Tue
19 °
Wed
27 °
Thu
26 °
Fri
27 °
Sat
28 °

Most Popular

Recent Comments