पुणे / सांगली — स्वतःचे घर… हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न. या स्वप्नाला आज प्रत्यक्ष रुप मिळाले ते चंदुकाका सराफ ज्वेल्समुळे. दिवाळीच्या ‘ग्रँड फेस्टिव्ह ऑफर’ अंतर्गत ठेवण्यात आलेल्या 2 BHK फ्लॅट मेगा ड्रॉचा निकाल जाहीर झाला आणि सांगलीच्या सौ. नूतन संदीप माने यांचे आयुष्यभरासाठीचे भाग्य उजळले.
200 वर्षांच्या विश्वासाची परंपरा — ग्राहकांसाठी अनोखी सुवर्णसंधी
सुवर्ण खरेदीचा दीर्घ परंपरागत वारसा जपणाऱ्या चंदुकाका सराफ ज्वेल्सने यंदाच्या दिवाळीत ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक आणि भव्य अशी ऑफर जाहीर केली होती. सोनं–दागिने खरेदीसोबतच आयुष्य बदलणारी 2 BHK फ्लॅट जिंकण्याची संधी या ऑफरमधून देण्यात आली. ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर मेगा ड्रॉची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.

बालेवाडीमध्ये मेगा ड्रॉचा जल्लोषमय कार्यक्रम
चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या सॉलिटेअर बिझनेस हब 2, बालेवाडी हाय स्ट्रीट, बाणेर येथे मेगा ड्रॉचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.
ड्रॉची प्रक्रिया पारदर्शकतेने, आनंद आणि उत्कंठा यांच्या वातावरणात पूर्ण करण्यात आली. प्रचंड संख्येने ग्राहक सहभागी झालेल्या या मेगा ड्रॉचा मुख्य क्षण आला आणि सौ. नूतन संदीप माने यांचे नाव विजेत्या म्हणून जाहीर होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात जल्लोष व्यक्त केला.

बक्षिसांची केवळ घोषणा नव्हे – प्रत्यक्ष किल्ल्या हस्तांतराची परंपरा
केवळ ड्रॉ जाहीर करून थांबण्याऐवजी विजेत्यांना प्रत्यक्ष बक्षीस देण्याची चंदुकाका सराफ ज्वेल्सची परंपरा यावर्षीही कायम राहिली. सांगली शाखेत आयोजित विशेष सोहळ्यात संचालिका सौ. संगीता अतुल शहा यांच्या हस्ते सौ. नूतन माने यांना 2 BHK फ्लॅटच्या किल्ल्या प्रदान करण्यात आल्या.
या सोहळ्याला जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा सौ. माधुरी श्रीकांत चौगुले यांची विशेष उपस्थिती लाभली. चंदुकाका सराफ ज्वेल्सचे सेल्स हेड प्रभात मेहंदीरत्ता, क्लस्टर मॅनेजर तसेच कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. नूतन माने यांच्यासाठी हा क्षण अत्यंत भावनिक आणि आनंदाचा होता. किल्ल्या स्वीकारताना त्यांनी व्यक्त केलेला आनंद आणि प्रामाणिक प्रतिक्रिया संपूर्ण कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांची समृद्ध परंपरा
चंदुकाका सराफ ज्वेल्स विविधतेने नटलेले सोनं, हिरे आणि चांदीचे दागिने, नवनवीन डिझाईन्स आणि उच्च दर्जाची हमी यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात लाखो ग्राहकांचा विश्वास संपादन करत आहेत.
पुण्यातील रविवार पेठ, चिंचवड, भोसरी, सातारा रोड, कोथरूड, वाकड, चऱ्होली, बाणेर तसेच महाराष्ट्रातील सातारा, वाई, कराड, सांगली, कोल्हापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि कर्नाटकातील अथणी, गोकाक, बेळगावी व रबकवी या शाखांमध्ये सतत नवे कलेक्शन उपलब्ध असते.
दागिन्यांच्या शुद्धतेचे A+ मानक आणि पारदर्शक व्यवहारामुळे 200 वर्षांची परंपरा आजही त्याच ताकदीने ग्राहकांच्या मनात घर करून आहे.
विश्वासाचा वारसा कायम
ग्राहकांच्या प्रेम, विश्वास आणि सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल चंदुकाका सराफ ज्वेल्सने मनापासून आभार व्यक्त केले. ग्राहकांच्या आनंदासाठी, उत्सव-परंपरेत सहभागासाठी आणि आयुष्यभर स्मरणात राहतील अशा ऑफर्स देण्याची बांधिलकी त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.


