23.1 C
New Delhi
Sunday, March 29, 2026
Homeज़रा हट केराइडर-नेतृत्वाखालील समुदायांसाठी भारतातील पहिले भव्य राष्ट्रीय पुरस्कार 

राइडर-नेतृत्वाखालील समुदायांसाठी भारतातील पहिले भव्य राष्ट्रीय पुरस्कार 

-विंगमॅनएक्स अवॉर्ड्स पुण्यात होणार

पुणे, –  : भारताच्या राइडिंग समुदायासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणाऱ्या विंगमॅनएक्स अवॉर्ड्स २०२५ -२६ चे उद्घाटन १५ फेब्रुवारी २०२६  रोजी हॉटेल हयात पुणे येथे होणार आहे. भारतातील आघाडीचे कम्युनिटी-टेक व्यासपीठ विंगमॅनएक्स, मोटरसायकलस्वारांसाठी समर्पित या पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांचे आयोजन करत आहे.

राइडर-नेतृत्वाखालील सन्मानासाठी राष्ट्रीय मापदंड ठरणाऱ्या या पुरस्कारांचा उद्देश भारतीय मोटरसायकलिंगची खरी ओळख ठरवणाऱ्या चिकाटी, शिस्त, जबाबदारी आणि समुदायभावना यांचा गौरव करणे हा आहे. भारतात प्रथमच राइडिंग परिसंस्थेला मुल्यवर्धित करणाऱ्या गुणांसाठी राइडर्स आणि राइडिंग समुदायांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान केला जाणार आहे.

एका राइडरच्या गरजेतून उगम पावलेले आणि वाढत्या समुदायाने घडवलेले विंगमॅनएक्स अवॉर्ड्स, देशभरातील मोटरसायकलिंग संस्कृतीला शांतपणे बळकट करणाऱ्या व्यक्ती आणि क्लब्सचा सन्मान करतात.

या पुरस्कारांमध्ये एकूण २० निवडक श्रेणी आहेत, ज्यात वैयक्तिक उत्कृष्टता आणि सामूहिक समुदाय प्रभाव या दोन्हींचा समावेश आहे. सुरक्षित राइडिंगचे नेतृत्व, लांब पल्ल्याचे राइडिंग, महिला राइडर्स आणि समुदाय-नेतृत्वाखालील उत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या श्रेणी यात समाविष्ट असतील. यामध्ये गार्डियन राइडर अवॉर्डलाँग हॉल लेजेंड्सशी राईड्स फ्रीक्लब ऑफ द इयरसेफ्टी-फर्स्ट क्लब अशा श्रेणींचा समावेश आहे.

या उपक्रमामागील दृष्टीकोन स्पष्ट करताना निलेश साने, सीईओ आणि सह-संस्थापक, विंगमॅनएक्स म्हणाले, “विंगमॅनएक्सची सुरुवात राइडर्सना योग्य राइडिंग साथीदार शोधण्यात मदत करण्याच्या साध्या कल्पनेतून झाली. कालांतराने ते विश्वास, जबाबदारी आणि समुदायभावनेवर उभे असलेले एक व्यापक परिसंस्था बनले. विंगमॅनएक्स अवॉर्ड्स हे अशा राइडर्सचा सन्मान करण्याचे आमचे माध्यम आहे, जे रोज या मूल्यांनुसार जगतात आणि कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा ना करता, भारताची मोटरसायकलिंग संस्कृती घडवतात.”

याच भावनेला दुजोरा देताना उर्वशी पाटोले, पार्टनर – कम्युनिटी आणि मार्केटिंग म्हणाल्या, “राइडिंग विश्वात अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या सातत्य, शिस्त आणि उत्कटतेचा हा सन्मान आहे. मोटरसायकलिंग संस्कृती सतत विकसित होत असते आणि विंगमॅनएक्स अवॉर्ड्स दरवर्षी वाढत जाण्यासाठी सुरू केले गेले आहेत. हे पुरस्कार राइडर्सना केवळ त्यांनी किती अंतर प्रवास केला यासाठी नव्हे, तर त्यांनी समुदायाला कसे उंचावले यासाठी सन्मानित करतात.”

डॉ. साहिल त्रिंबकेसह-संस्थापक, विंगमॅनएक्स यांनी पुढे सांगितले, “मोटरसायकलिंग म्हणजे केवळ राइडिंग कौशल्य नाही; ते निर्णयक्षमता, जबाबदारी आणि रस्त्यावर एकमेकांची काळजी घेण्याची भावना आहे. विंगमॅनएक्स अवॉर्ड्स अशा राइडर्स आणि समुदायांचा सन्मान करतात, जे आपल्या कृतीतून ही मूल्ये स्थापित करतात, केवळ कामगिरीतून नव्हे. या मूल्यांचा सार्वजनिक गौरव करून आम्ही देशभरात अधिक सुरक्षित आणि जबाबदार राइडिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा ठेवतो.”

या पुरस्कारांच्या केंद्रस्थानी आहे विंगमॅनएक्स अॅप – राइडर्सनी राइडर्ससाठी तयार केलेले भारतातील अग्रगण्य कम्युनिटी-टेक व्यासपीठ. भारतातील विखुरलेल्या राइडिंग विश्वाला एक सुसंगत डिजिटल आधार देणारे हे अॅप राइड ट्रॅकिंग, क्लब मॅनेजमेंट, सुरक्षा वैशिष्ट्ये, सत्यापित राइडर प्रोफाइल्स आणि समुदाय शोध अशा सुविधा पुरवते. अलीकडेच यात राइडर बॅजेस, राइडदरम्यान लाईव्ह ग्रुप लोकेशन ट्रॅकिंग आणि पीअर-आधारित राइडर रेटिंग्स ही नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत, ज्यामुळे जबाबदारीची भावना अधिक बळकट होते.८०, ००० हून अधिक अॅप डाउनलोड्स आणि ५०० पेक्षा जास्त राइडिंग क्लब्स आधीच सक्रिय असलेल्या विंगमॅनएक्स प्लॅटफॉर्मवर, भारतीय मोटरसायकलस्वार कसे जोडले जातात, कसे राइड करतात आणि एकत्र कसे प्रगती करतात याची व्याख्या सतत नव्याने केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
56 %
2.6kmh
94 %
Sun
35 °
Mon
34 °
Tue
35 °
Wed
36 °
Thu
37 °

Most Popular

Recent Comments