सांगली- काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यास जाती जातीत विभाजन करण्याचे काम करेल, 2014 च्या आधी देशाचा सन्मान होत नव्हता. ना शेतकरी, ना व्यापारी, ना मुली देशात सुरक्षित होत्या. 2014 नंतर परिस्थिती बदलली देशाची सीमा सुरक्षित झाल्या आहेत. दहशतवाद पूर्णपणे नष्ट झाला असल्याचे प्रतिपादन सीएम योगी आदित्यनाथ यांनी केले. सांगलीमध्ये भाजप खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ योगी यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना योगी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस गो हत्या खुलेपणाने करू इच्छित आहे, हे मोठे पाप काँगेस करत आहे. काँग्रेस आता खोटं बोलता येईल तितके बोलत आहे, कारण या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहासजमा होईल अशी त्यांनी भीती आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याचे धाडस करत नाही. जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेस विभाजन करण्याचा डाव आखत आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यास जाती जातीत विभाजन करण्याचे काम करेल. सर्वांत यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. भारतात कुठे बॉम्बस्फोट झाला, तर पाकिस्तान पहिल्यांदा स्पष्टीकरण देते की आम्ही हे केलं नाही. देशातला शेतकरी आत्महत्या करत नाही, जवानांसाठी अनेक योजना सरकार राबवत आहे. देशावर कुठले संकट आले तर राहुल गांधी पहिला देश सोडून जातात. कोरोना काळात राहुल गांधी इटलीला निघून गेले. राहुल गांधी परदेशात भारताचा अवमान करतात, सबका साथ सबका विकास पंतप्रधान मोदींचा मंत्र होता. त्यामुळे दहा वर्षात अनेक गोष्टी बदलून गेल्या असल्याचे योगी यांनी सांगितले.
…अन्यथा जाती- जातीत विभाजन होईल!
सीएम योगी आदित्यनाथ यांची टीका
RELATED ARTICLES
New Delhi
few clouds
28.4
°
C
28.4
°
28.4
°
77 %
2.7kmh
21 %
Wed
38
°
Thu
40
°
Fri
38
°
Sat
36
°
Sun
35
°