25.2 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeताज्या बातम्याकाय सांगता? जुळ्या बहि‍णींचे जुळं यश

काय सांगता? जुळ्या बहि‍णींचे जुळं यश

बारावीत नव्हे तर दहावीत देखील दोघींनी घवघवीत यश संपादन केले

पुणे- गेल्या ३ ते दिवसाखाली राज्यासह सर्वच ठिकाणी इ. १२ वी निकाल लागला. यामध्ये गुणवत्तेत मुलींचाच वरचष्मा होता.  सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील जुळ्या बहिणींने अनोखे जुळे यश मिळविल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही त्यांनी दोघींनी इ. १० वी सुद्धा घवघवीत यश संपादन केले आहे. जुळ्या बहिणींनी इ. १२ वी मध्ये केबीपी महाविद्यालयामध्ये प्रथम व द्वितीय येण्याचा विक्रम केला आहे. याशिवाय बारावीला गणित विषयामध्ये देखील दोघींनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.पंढरपूर येथील दहावीला येथील कवठेकर प्रशाले मधून सिद्धी व रिद्धी या दोघींनी ९८.६० टक्के एकसारखे गुणप्राप्त करीत पंढरपूरमध्ये दोघींनी पहिला येण्याचा मान पटकावत जुळे यश संपादन केले होते.

 तर केबीपी महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी सिद्धी व रिद्धी संतोष रोपळकर या जुळ्या बहिणींनी बारावीच्या परीक्षेत  महाविद्यालयामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सिद्धी रोपळकर हिने ९२.१७ टक्के, तर रिद्धीने ९१.८३ टक्के गुण प्राप्त केले आहेत. या दोन्ही जुळ्या बहिणींनी बारावी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्क्याहून अधिक गुण प्राप्त करीत अनोखे जुळे यश प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.   बांधकाम व्यावसायिक व सिव्हिल इंजिनिअर   संतोष रोपळकर यांना सिद्धी व रिद्धी या दोन जुळ्या मुली आहेत. कुशाग्र बुद्धीच्या या दोन्ही जुळ्या बहिणी शालेय जीवनापासूनच अभ्यासामध्ये प्रगतीपथावर आहेत. विशेष बाब म्हणजे, दहावीच्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत देखील दोघींनी घवघवीत यश संपादन केले होते.  बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत देखील या दोघीं जुळ्या बहिणींनी केबीपी महाविद्यालयामध्ये प्रथम व द्वितीय येण्याचा विक्रम केला आहे. याशिवाय बारावीला गणित विषयामध्ये देखील दोघींनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
25.2 ° C
25.2 °
25.2 °
77 %
4.2kmh
15 %
Sun
29 °
Mon
31 °
Tue
35 °
Wed
37 °
Thu
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!