18.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeताज्या बातम्याकिवळे गावच्या विकासासाठी आम्ही शंकरभाऊंसोबत

किवळे गावच्या विकासासाठी आम्ही शंकरभाऊंसोबत

किवळे गावभेट दौऱ्यात शंकर जगताप यांनी घेतला ग्रामस्थांचा आशीर्वाद

किवळेतील डीपी रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आभार

किवळेतील ग्रामस्थ आणि असंख्य युवा कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश

शंकर जगताप यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन प्रवेश; कार्यकर्त्यांची भावना

चिंचवड : – सामाजिक बांधिलकी जपत गावातील एकोपा अबाधित राखणारे गाव अशी आमच्या किवळे  गावची ओळख आहे. २५ वर्षांपूर्वी आमचे गाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झाले. स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्या कार्यकाळात आमच्या गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले. किवळेतील १८ मीटर डीपी रस्त्यांसह अंतर्गत स्त्यांचा प्रश्न  शंकरभाऊंनीही पुढाकार घेऊन मार्गी लावला. त्यामुळे गावाचा अशाच पद्धतीने यापुढेही विकास व्हावा, यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीने आणि एकदिलाने शंकर जगताप यांच्यासोबत राहू, असे आश्वासन किवळे ग्रामस्थांनी दिले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी गावभेट दौऱ्यानिमित्त किवळे गावातील ग्रामस्थ आणि नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी नागरिकांनी अगत्याने स्वागत करून महाविजयाचा आशीर्वाद दिला.

या भेटीदरम्यान माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, माजी नगरसेविका  सुमन नेटके, संदीप तरस, उमेश सांडभोर, बाबासाहेब सांडभोर,  सचिन सांडभोर, संदीप सांडभोर,  राजेश सांडभोर, कैलास कातळे, समीर कातळे, संजय कातळे, मोरेश्वर कातळे, बाळकृष्ण कातळे, सदाशिव कातळे, तुकाराम तरस, अतिश तरस,  सुधीर साळुंखे, नवनाथ तरस, भरत तरस, विश्वंभर गायकवाड, नवनाथ लोखंडे, बाळू तरस, अशोक तरस,  गौतम गायकवाड, बाळासाहेब धुमाळ, किरण धुमाळ, सुरेश धुमाळ, गणेश धूमाळ, नितीन तरस, बापू तरस, विजय तरस, दिपक तरस,  निलेश तरस, गणेश जुनवणे, संदीप काळे, सुदाम तरस, अजय उर्फ बिटू लंगे, अंकुश जाधव, मोहन कदम, अंकुश कुदळे, अलका पांडे, विलास तरस, आयुष तरस, बैलगाडा मालक आदेश तरस, विष्णू तरस, रोहिदास तरस, दिलीप दांगट, राजेंद्र तरस, शुभम दांगट, राजेश दांगट, हुमानत अण्णा बगालर, संजय चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.

याप्रसंगी अनिल चव्हाण, गोरख तरस, रवींद्र कडू, दत्ता काटकर, मारुती पवार, विशाल तरस, दशरथ साळुंके, ओबीसी सेल अध्यक्ष प्रदीप बिलगे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील असंख्य युवा  कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत किवळे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब धुमाळ, सुरेश धुमाळ, प्रसाद धुमाळ, गणेश धुमाळ, किरण धुमाळ यांच्यासह असंख्य युवकांनी यावेळी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

“चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने जो विकास झाला तो स्व. लक्ष्मणभाऊंच्या माध्यमातून झाला. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम शंकर जगताप यांनी यशस्वीपणे केले. त्यांनी मागील दोन वर्षात भाजप पक्षवढीसाठी आणि चिंचवडच्या विकासासाठी सातत्याने नियोजनबद्ध पद्धतीने काम केले आहे. त्यांच्या याच कार्यप्रणालीने प्रभावित होऊन आम्ही हा पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता पक्षप्रवेश करून न थांबता किवळे गावच्या विकासासाठी शंकरभाऊंनाच आमदार करणार असल्याचे”, त्यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
18.1 ° C
18.1 °
18.1 °
55 %
0kmh
0 %
Thu
22 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!