25.3 C
New Delhi
Sunday, August 24, 2025
Homeताज्या बातम्याखासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी

खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी

पहिल्याच डावात खासदार ते थेट केंद्रिय मंत्रिपदाची माळ

पुणे- , पुणे लोकसभा मतदार संघातून निवडूक लढविणारे मुरलीधर मोहोळ यांनी मोठा विजय मिळाला होता. त्यांना थेट महापौर पदावरुन पहिल्याच डावात खासदार ते थेट केंद्रिय मंत्रिपदाची माळ त्यांचा गळ्यात पडली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोरील प्रांगणात झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात केंद्रिय मंत्री पदाची शपथ घेतली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे लोकसभा मतदार संघात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा. 86,369 मतांनी पराभव केला होता. 4,15,543 मतांनी त्यांचा विजय झाला होता. मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातील पर्वती, कोथरुड परिसरातून मोठे मताधिक्य मिळाले. कोथरुड, पर्वती, वडगाव शेरी, शिवाजीनगर हे भाजपचे पारंपारिक मतदार आहेत.
त्यांच्या एकगठ्ठा मतांनी मुरलीधर मोहोळ हे थेट महापौर पदावरुन खासदार आणि खासदार पदावरुन थेट केंद्रिय मंत्री झाले आहेत. पुण्याचे खासदार मुलरीधर मोहोळ यांनी नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळालं. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला होता. नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे. मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आहेत.
मुरलीधर मोहोळांनी कोरोना काळात मोठी कामगिरी बजावली. पुण्यात कोरोनाची महामारी असताना ते जनतेत उतरले आणि पुण्यातील कोरोना परिस्थिती उत्तम हाताळली. त्यावेळी ते महापालिकेचे महापौर होते. सोबतच भाजपच्या पक्षश्रेष्ठीसोबत दांडगा आहे.पक्ष संघटनेत वॉर्ड सरचिटणीस, वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव, उपाध्यक्ष, शहर भाजपचे सरचिटणीस, शिक्षण मंडळाचे सदस्य, प्रदेश सरचिटणीस अशा विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.आहेत. मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यामुळे पुण्यात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
आतापर्यंत, पुण्याला चार केंद्रीय मंत्री मिळाले होते. त्यामध्ये एन.व्ही. गाडगीळ, मोहन धारिया, व्ही.एन. गाडगीळ, सुरेश कलमाडी आणि एन.जी. गोरे यांचा समावेश होता. मोहोळ हे आता केंद्रीय मंत्री झालेले पुण्याचे पाचवे खासदार असणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
79 %
3.2kmh
18 %
Sun
31 °
Mon
31 °
Tue
35 °
Wed
37 °
Thu
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!