ढोल ताशा महासंघ महाराष्ट्रच्यावतीने एकत्रित वाद्यपूजन कार्यक्रम
पुणे : ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्र च्या माध्यमातून पथकांचे चांगले संघटन बांधले गेले आहे. ganesh puja गणेशोत्सवापूर्वी ढोल-ताशा पथकांना सरावासाठी अनेक अडचणी येतात. पाऊस व इतर संकटांवर पथके मात करतातही. मात्र, पोलिसांकडून परवानगी नाकारली जाणे, ही मोठी अडचण असते. पोलीस आयुक्त नवीन असून त्यांच्याशी देखील याबाबत बोलून ढोल-ताशा सरावासाठी पोलिसांकडून होणारी अडचण दूर करु, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.ganpati bappa morya
ढोल ताशा dhol tashs महासंघ महाराष्ट्र तर्फे एकत्रित वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वाद्य व ध्वज पूजन झाले. कार्यक्रमाला कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, बाळासाहेब मारणे, शिरीष मोहिते, नितीन पंडित, भूषण पंड्या, ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष पराग ठाकूर parag thakur आदी उपस्थित होते.
महासंघाचे अनुप साठ्ये, शिरीष थिटे, ओंकार कळढोणकर, अक्षय बलकवडे, प्रशांत तांबे, प्रकाश राऊत, अभिजीत कुमावत, विनोद आढाव आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. विविध गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिका-यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सर्वांच्या हस्ते गणपतीची आरती देखील करण्यात आली.
पराग ठाकूर म्हणाले, ढोल-ताशा वादनातून एकप्रकारे प्रत्येक वादक परमेश्वराची सेवा करीत असतो. त्यामुळे त्याचे पावित्र्य आपण जपायला हवे. पुण्याच्या गणेशोत्सवाला शाही वैभव आहे. जगभर गाजलेला हा उत्सव असून तो साजरा करण्याचे आणि त्यामध्ये वादन करण्याचे भाग्य आपल्याला मिळते. त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने ढोल-ताशा या वाद्यांसोबतच लेझीम, झांज, ध्वज, शौर्याचे खेळ देखील पथकांनी सुरु करा