पुणे- लाेकसभा निवडणुकीच्या चाैथ्या टप्प्यातील प्रचार थंडावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी, काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी, नितीन गडकरी, शरद पवार, राज ठाकरे आदी नेत्यांच्या सभांमुळे अखेरच्या टप्प्यात पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.पुणे जिल्ह्यातील बारामती लाेकसभा मतदारसंघाचे मतदान ७ मे राेजी पार पडले. तर पुणे शहर, मावळ व शिरुर या तीन लाेकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान हाेत आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात उमेदवारांकडून जाेरदार प्रचार रॅलीज, गाठीभेटी आदींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पाेहचण्याचा प्रयत्न केला गेला. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची सभा पार पडल्यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली. त्यापाठाेपाठ काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची प्रचार सभा झाल्यानंतर महाविकास आघाडीने प्रचारास जाेरदार प्रारंभ केला. एकीकडे महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचाराची चुरस दिसुन येत आहे. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडी व एमायएमच्या उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा जाेर वाढविल्याचे दिसुन आले.
बारामती लाेकसभा मतदारसंघाचे मतदान झाल्यानंतर महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुणे जिल्ह्यातील इतर मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली. महायुतीकडून उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा आयाेजित केल्या गेल्या. तर महाविकास अाघाडीकडून शरद पवार, युवा सेनेचे आदीत्य ठाकरे यांच्या सभा आयाेजित केल्या गेल्या, परंतु पवार व ठाकरे यांची सभा पावसामुळे रद्द करावी लागली. एकीकडे सभांवर भर सुरु असतानाच पडद्यामागील हालचालींना वेग येऊ लागला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी व रणनिती ठरविण्यासाठी विदर्भातील काॅंग्रेस नेते पुण्यात ठाण मांडून बसले आहे. यामध्ये सुनील केदार, नितीन राऊत अादी नेत्यांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीचे डाॅ. प्रकाश आंबेडकर हे देखील पुण्यात लक्ष ठेवून आहेत.
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
चाैथ्या टप्प्यातील प्रचार थंडावणार
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
26.3
°
C
26.3
°
26.3
°
92 %
4.8kmh
100 %
Mon
31
°
Tue
34
°
Wed
36
°
Thu
33
°
Fri
32
°