पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात पसार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरातून सोमवारी अटक केली. सामूहिक बलात्कार प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. अख्तर अली शेख (वय २८, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणात यापूर्वी रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत (१५ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शेख, कनोजिया यांच्याबरोबर असलेला एक साथीदार पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. बोपदेव घाट परिसरात ३ ऑक्टोबर रोजी रात्री मित्राबरोबर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी बोपदेव घाटाच्या परिसरातील ४५ गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराइतांची चौकशी केली. तसेच, पुणे जिल्ह्यातील घाट तसेच टेकड्यांच्या परिसरात लूटमार, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली होती. आरोपींचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखेकडून ६० पथके तयार करण्यात आली होती. बोपदेव घाटामार्गे गेलेल्या ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १० ऑक्टोबर रोजी येवलेवाडी परिसरातून कनोजियाला अटक करण्यात आली होती.
दुसरा आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण
RELATED ARTICLES
New Delhi
haze
17.1
°
C
17.1
°
17.1
°
67 %
0kmh
0 %
Thu
22
°
Fri
27
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
29
°