देशाची घटना बदलायची आहे. त्यामुळेच ४०० पारचा नारा देत आहेत. पीएम मोदी ठिकठिकाणी जातात आणि भाषण करतात. एकदा त्यांनी दिल्लीत भाषण केलं. शेतीच्या क्षेत्रात ऐतिहासिक काम शरद पवारांनी केलं. तसंच, पवारांचा हात धरुन मी राजकारणात पावलं टाकली असं देखील ते म्हणाले होते. टीका करायचा त्यांचा अधिकार आहे. तसंच, ‘ज्यांनी irrigation बाबत आरोप केले. घोटाळ्याचे आरोप केले. ते आज सगळे कुठे आहेत? यावरून तुम्हाला मोदींच्या बोलण्याचा अर्थ कळला असेल. हुकुमशाहीला निमंत्रण देणाऱ्या प्रवृत्तीला बाजूला ढकलायचे असेल तर याचा पराभव केला पाहिजे. नुसती तुतारी नाही. तर तुतारी हातात घेऊन उभा असलेला माणूस ही आपली खूण आहे. सुप्रियाला निवडून द्या.’, असे आवाहन शरद पवार यांनी सासवडकरांना केले आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. पुण्यामध्ये आज शरद पवार यांनी देखील सभा घेतली. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सासवडमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी व भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘आज मोदीसाहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत. हे पाहिल्यानंतर चिंता वाटते.’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मांडले.
सासवड येथील सभेमध्ये महाविका आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांनी देखील नरेंद्र मोदींवर टीका केली. शरद पवार म्हणाले की, ‘ही निवडणूक वेगळी आहे. ही निवडणूक देश कोणत्या पध्दतीने चालवायचा हे ठरवणारी निवडणूक आहे. आज मोदीसाहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात ते पाहिल्यानंतर चिंता वाटते. लोकांच्या सहमतीने आणि लोकशाही मार्गाने सध्या देश चालवायची गरज आहे.’, असे मत व्यक्त करत शरद पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.