पुणे- सध्या देशासह राज्यात मोठया प्रमाणावर उष्मालहरीचा प्रभाव हा दिसून येत आहे. यासह देशात सध्या मोठ्याप्रमाणावर पाणी टंचाई ही निर्माण झाली आहे. देशातली ही परिस्थीती राज्यातही आहे. पुण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उपलब्ध पाणीसाठ्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील 26 पैकी एका धरणातील पाणीसाठा हा शुन्यावर पोहचला आहे. उजनीतील अचल पाणीसाठ्यानेही तळ गाठला आहे. उजनीतील अचल पाणीसाठाही 43 टक्क्यांनी कमी झाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून फक्त 27.83 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्ल्क राहिला आहे. एकूण पाणीसाठ्याचे हे प्रमाण अवघे 14.03 टक्के इतके आहे. सध्याचा उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 18.75 टीएमसी इतका कमी आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला 46.58 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या आजच्या तारखेच्या उपलब्ध उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण 23.48 टक्के इतके होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा हा 9.45 टक्क्यांनी कमी झाला आहे.
धरणात फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक
पुण्यात पाणी टंचाई
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
23.7
°
C
23.7
°
23.7
°
37 %
3.4kmh
0 %
Thu
30
°
Fri
31
°
Sat
33
°
Sun
33
°
Mon
33
°