10.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeताज्या बातम्या'पर्यावरण दिना’निमित्त शिवसेनेकडून भव्य जनजागृती दिंडीचे आयोजन

‘पर्यावरण दिना’निमित्त शिवसेनेकडून भव्य जनजागृती दिंडीचे आयोजन

पुणेकर नागरिकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा संकल्प करावा - प्रमोद नाना भानगिरे

पुणे : पुणे शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता पर्यावरणाचे संवर्धन अत्यावश्यक बनले आहे. शहराच्या चारही बाजूंना असलेल्या डोंगररांगा आणि हिरव्यागार टेकड्यांचे सौंदर्य टिकवण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे असे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी आवाहन केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने ‘पर्यावरण जनजागृती दिंडी’चे आयोजन करण्यात आले. मित्र मंडळ चौकातील पर्यावरण शिल्पाला रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिंडीला सुरुवात करण्यात आली.

या दिंडीत शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर, पुणे सहसंपर्कप्रमुख अजयबापू भोसले, महिला आघाडी पुणे महानगर प्रमुख कल्पना थोरवे, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शनाताई त्रिगुणाईत, माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी, संदीप मोहिते पाटील, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, प्रमोद प्रभुणे, नितीन पवार, शिवसेना डॉक्टर सेल प्रमुख डॉ. रणजीत निकम, विभाग प्रमुख महेंद्र जोशी, शिव कामगार सेना प्रमुख संदीप शिंदे, शहर समन्वयक नवनाथ निवंगुणे, महिला आघाडी शहर प्रमुख सुरेखा पाटील, श्रुती नाझीरकर, श्रद्धा शिंदे, विभागप्रमुख उद्धव कांबळे, महेंद्र जोशी, मनोज कुदळे, निलेश जगताप, अनिल गडकरी, नितीन पायगुडे, रणजित ढगे, तुषार भामरे, अभिषेक जगताप, यांच्यासह महिला आघाडी, युवासेना व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिंडीची सुरुवात टाळ-मृदुंगाच्या निनादात, आणि “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. “झाडे लावा, झाडे जगवा”, “निसर्ग आहे आपले घर, त्याचे करा रक्षण खरं”, “गाड्या कमी, पायपीट वाढवा”, “प्रदूषण थांबवा”, “एक दिवस पर्यावरणासाठी, एक दिवस वृक्षासाठी” या घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली.

महिला कार्यकर्त्यांनी पारंपरिक फुगडी खेळत “झाडे लावा, झाडे जगवा”चा संदेश दिला. यानिमित्ताने पाच हजार तुळशीच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.

दिंडीचा समारोप बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन येथे झाला. संदीप मोहिते पाटील यांचा वाढदिवस देखील वृक्ष दिंडीच्या औचित्याने साजरा करण्यात आला. पर्यावरण दिंडीच्या समारोपप्रसंगी बोलताना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, “प्रदूषणमुक्त पुण्यासाठी झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पर्यावरण रक्षणासाठी समाजात जागरूकता निर्माण करून एक मोठी चळवळ उभारणे गरजेचे आहे.”

महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर म्हणाले, “प्रत्येकाने एका झाडाची जबाबदारी स्वीकारली, तर पर्यावरणाचे रक्षण सहज शक्य होईल.”

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाने पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत एक सकारात्मक उर्जा निर्माण केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
10.1 ° C
10.1 °
10.1 °
87 %
1kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!