26.2 C
New Delhi
Thursday, July 31, 2025
Homeताज्या बातम्यापार्टीहून परतणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

पार्टीहून परतणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

पुणे – पुण्यामध्ये भरधाव कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात ही घटना घडली आहे. पार्टी करून घराच्या दिशेनं जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला भरधाव वेगातील आलिशान कारनं धडक दिली. या अपघातात तरुण-तरुणीलाचा जागीच मृत्यू झाला.
अकिब रमजान मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादनूसार येरवडा पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलंय. सदरील घटना शनिवारी मध्यरात्री २:३० वाजेच्या सुमारास घडली. तर या अपघातात अनिस अवधिया आणि त्यांची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परतत होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर एका आलिशान गाडीनं एम.एच. १४ सी क्यु ३६२२ या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथील पाहणी केली. तसंच आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या अपगातावेळी गाडीची स्पीड २०० च्या वर होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मृत तरुण-तरुणी राजस्थानचे राहणारे होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
26.2 ° C
26.2 °
26.2 °
96 %
4.1kmh
99 %
Thu
33 °
Fri
35 °
Sat
35 °
Sun
34 °
Mon
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!