26.1 C
New Delhi
Friday, April 3, 2026
Homeताज्या बातम्यापुण्यात “सेवा Fest 2026” उत्साहात दिमाखात संपन्न

पुण्यात “सेवा Fest 2026” उत्साहात दिमाखात संपन्न

पुणे –

पुणे शहरातील मध्यवर्ती व निसर्गरम्य परिसरात वसलेल्या पु. ल. देशपांडे उद्यान (जपानी गार्डन), सिंहगड रोड येथे Seva Sahayog Foundation यांच्या वतीने आयोजित “सेवा Fest 2026” हा सामाजिक उपक्रम आज उत्साह, ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात दिमाखात संपन्न झाला. स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.

“Revive, Rejoice & Rejuvenate the Spirit of Seva!” या प्रभावी घोषवाक्याखाली पार पडलेल्या या फेस्टमध्ये सेवाभाव, सहकार्य आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा ठाम संदेश देण्यात आला. विविध सामाजिक प्रकल्पांचे सादरीकरण करताना स्वच्छता अभियान, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण प्रसार, महिला सक्षमीकरण, आरोग्य जनजागृती आणि समुदाय विकास या क्षेत्रातील कार्याचा सविस्तर आढावा मांडण्यात आला. उपस्थितांनी या उपक्रमांचे कौतुक करत सामाजिक चळवळीला अधिक बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान घनकचरा व्यवस्थापनाबाबत विशेष जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले. श्वेता सूर्यवंशी मॅडम, हेमंत भराडे सर, युवराज चाबुकवर सर आणि मंदार जाधव सर यांनी पर्यावरण संवर्धन, कचरा वर्गीकरण आणि नागरिकांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करत उपस्थितांना कृतीशील सहभागाचे आवाहन केले.

यावेळी संघशिल भद्रे सर, गोविंद मोरे सर यांच्यासह मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सेवा सहयोग फाउंडेशन, सेवा फेस्ट टीम आणि सर्व स्वयंसेवकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
26.1 ° C
26.1 °
26.1 °
53 %
3.1kmh
75 %
Fri
27 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
34 °
Tue
35 °

Most Popular

Recent Comments