28 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeताज्या बातम्याबांगलादेशात हिंदूंची सुरक्षा करावी

बांगलादेशात हिंदूंची सुरक्षा करावी

विश्व हिंदू परिषद ; अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी भारत सरकारने शक्य ती सर्व पावले उचलावीत

पुणे : भारता शेजारील बांगलादेश हिंसाचार आणि अराजकतेने ग्रासलेला आहे. निवडून आलेल्या पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडून गेल्यानंतर अराजकतावादी घटक प्रबळ झाले असून कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कुचकामी झाली आहे. या गोंधळाच्या परिस्थितीत तेथील अतिरेकी जिहादी घटकांनी हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू केले आहेत. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी भारत सरकारने शक्य ती सर्व पावले उचलावीत, असे आवाहन विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, क्षेत्रीय धार्मिक पुंज प्रमुख संजय मुरदाळे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, सहमंत्री सतीश गोरडे, बजरंग दल संयोजक नितीन महाजन, विभाग मंत्री धनंजय गायकवाड व केतन घोडके उपस्थित होते.

किशोर चव्हाण म्हणाले, बांगलादेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धार्मिक स्थळे, व्यापारी दुकाने आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. हे भयंकर कृत्य बांगलादेशातील प्रत्येक जिल्ह्यात घडत असल्याची माहिती आहे. कट्टरवाद्यांच्या निशाण्यापासून स्मशानभूमीही सुटलेली नाही. मंदिरांचे मोठे नुकसान झाले आहे. बांगलादेशात क्वचितच असा कोणताही जिल्हा शिल्लक असेल जो त्यांच्या हिंसाचाराचे आणि दहशतीचे लक्ष्य बनला नसेल.

संजय मुरदाळे म्हणाले, वेळोवेळी होणा-या अशा दंगलींचाच हा परिणाम आहे. फाळणीच्या वेळी बांगलादेशातील हिंदूंची संख्या जे ३२% होती, ते आता ८% पेक्षा कमी राहिले आहेत आणि ते सतत जिहादी अत्याचाराला बळी पडत आहेत. बांगलादेशात हिंदूंची घरे, दुकाने, कार्यालये, व्यावसायिक संकुले, महिला, मुले आणि अगदी मंदिरे, त्यांच्या श्रद्धा व श्रद्धांचे केंद्रेही सुरक्षित नाहीत. तेथील पीडित अल्पसंख्याक हिंदूंची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे, ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांसाठी प्रभावी कारवाई करणे गरजेचे आहे. या परिस्थितीत भारत नक्कीच शांत राहू शकत नाही. भारताने आपल्या परंपरेनुसार जगभरातील शोषित आणि विस्थापित लोकांना मदत केली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी भारत सरकारने शक्य ती सर्व पावले उचलावीत, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. तेथील अल्पसंख्याक समाजाला मानवी हक्क मिळायला हवेत आणि बांगलादेशच्या सततच्या आर्थिक प्रगतीत कोणताही अडथळा येऊ नये. हिंदू समाज आणि भारत सरकार या प्रकरणात बांगलादेशचे सहयोगी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • सिमेपलीकडून घुसखोरी करण्याचा मोठा प्रयत्न होऊ शकतो
    बिकट परिस्थितीचा फायदा घेत जिहादी सिमेपलीकडून घुसखोरी करण्याचा मोठा प्रयत्न करू शकतात. याबाबत सावध राहावे लागेल. त्यामुळे आपल्या सुरक्षा दलांनी सीमेवर कडक नजर ठेवणे आणि कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ न देणे आवश्यक आहे. बांगलादेशात लवकरात लवकर लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष सरकार पुन्हा प्रस्थापित व्हावे, अशी आमची इच्छा आहे, असे विहिंपने म्हटले आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
82 %
3.7kmh
100 %
Mon
28 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!