33.8 C
New Delhi
Sunday, July 6, 2025
Homeताज्या बातम्याबाईक रॅली व जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद

बाईक रॅली व जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद

दक्षिण भारतीय मतदारांचाही बारणे यांना पाठिंबा

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नवीन पनवेल, खारघर व कामोठे या परिसरात काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला तसेच रात्री कामोठे येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली असल्यामुळे त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे, असे आवाहन बारणे यांनी यावेळी केले.

बाईक रॅलीमध्ये शेकडे तरुण महायुतीतील आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. रॅलीमधील विजया रथावर खासदार बारणे, यांच्या आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष ‌अविनाश कोळी यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.चौका-चौकात फटाके वाजवून, पुष्पवृष्टीमध्ये सुवासिनींकडून औक्षण करण्यात येत होते. मोदींचा मुखवटा परिधान केलेल्या युवकही रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीमध्ये रिक्षाचालकांचा सहभाग ही उल्लेखनीय होता. काही तरुण-तरुणींनी कोळी नृत्य सादर करीत बारणे यांचे जोरदार स्वप्न रस्त्याच्या दुतर्फा जमा झालेल्या जनसमुदायाला बारणे यांनी अभिवादन केले व मतदारांचे आशीर्वाद घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
33.8 ° C
33.8 °
33.8 °
66 %
1.1kmh
99 %
Sun
32 °
Mon
33 °
Tue
36 °
Wed
31 °
Thu
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!