28.3 C
New Delhi
Sunday, October 12, 2025
Homeताज्या बातम्यामिळकत कर थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करा; युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस...

मिळकत कर थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करा; युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील

खासदार सुप्रिया सुळेंनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

पुणे : दहा लाख रुपयांच्या अनामत रकमेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे या गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आता नवीन वादात सापडले आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने २०१९ पासून पुणे महापालिकेचा तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकत कर थकवला असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर रुग्णालयाविरोधात प्रचंड प्रमाणात रोष वाढला आहे. मिळकत कर थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तत्काळ दंडात्मक कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पुणे महानगरपालिका कर आकारणी व संकलन विभागाच्या उप आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील, विद्यार्थी काँग्रेस पुणे सरचिटणीस कृष्णा साठे, दीपक चौगुले, ज्ञानेश्वर जाधव, कुलदीप नाईकनवरे, देवेंद्र खाटीर, बाबा मिसाळ, सुनील कुसाळकर, ऋषिकेश आंधळे हे उपस्थित होते.

खासदार सुप्रिया सुळे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत मिळकत कर प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. पुढील दोन दिवसात तत्काळ कायदेशीर बाबी तपासून रुग्णालयावर कारवाई करा अन्यथा गुरुवारपासून मी स्वतः युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलनास बसणार असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी महापालिकेला दिला आहे. सरकार या रुग्णालयास पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सर्वसामान्य पुणेकरांना एक न्याय आणि धनदांडग्यांना वेगळा न्याय अशी भूमिका घेता येणार नाही असेही सुळे यांनी म्हटले आहे.

पैश्यासाठी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या, एका गर्भवती महिलेचा जीव घेऊन नवजात दोन जुळ्या मुलांना आईच्या मायेला पोरकं करणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने २०१९ साला पासून २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपये इतका मिळकत कर भरला नाही. गेल्या ६ वर्षांपासून जर रुग्णालय कर भरत नसेल तर आजपर्यंत महापालिकेने या रुग्णालयावर कारवाई का केली नाही? सर्वसामान्य नागरिकांनी मिळकत कर भरला नाही तर घराला टाळे ठोकण्याची, शास्ती आणि जप्तीची तसेच दंड आकारण्याची कारवाई करण्यात महापालिका जी तत्परता दाखवते तीच तत्परता दाखवून, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. आमच्या निवेदनाची दखल घेऊन खासदार आदरणीय सुप्रिया ताई सुळे यांनी महापालिकेला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. कायदेशीर बाबी तपासून दोन दिवसात उत्तर न दिल्यास व रुग्णालयावर कारवाई न केल्यास गुरुवारपासून सुप्रिया ताई स्वतः आमच्यासोबत आंदोलनास बसणार आहेत.

  • रोहन सुरवसे-पाटील
    सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
28.3 ° C
28.3 °
28.3 °
35 %
2.3kmh
0 %
Sat
28 °
Sun
32 °
Mon
33 °
Tue
33 °
Wed
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!