24.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रात मते मागण्याचा मोदींना अधिकार नाही!

महाराष्ट्रात मते मागण्याचा मोदींना अधिकार नाही!

नाना पटोलेंची पंतप्रधानांवर टीका

पुणे- देशातील ज्वलंत प्रश्‍नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही. गेल्या १० वर्षांच्या सत्ता काळात देशातील जनतेसाठी त्यांनी काय-काय केले हे देखील सांगत नाही, कारण सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात मते मागण्याचा अधिकारच नाही, कारण त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही. महाराष्ट्राला फक्त खोके तसेच फोडा आणि राज्य करा, हेच दिले आहे. येथील शेतकरी, महिला, युवकांसाठी काहीच केले नाही. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविणारे व राज्यातील शेतकर्‍यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यास लावणाऱ्या मोदींना महाराष्ट्रात मते मागण्याचा नैतिक अधिकारच नाही. अशा शब्दांमध्ये कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर पुण्यात टीका केली. तसेच लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या जेवढ्या सभा होतील, तेवढाच फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होईल अशी टिपण्णी त्यांनी केली.
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराकरिता नाना पटोले पुणे शहराच्या दौरावर आहेत. यावेळी कॉंग्रेस भवन येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर पटोले यांनी पुण्यातील पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, निवडणुक प्रचार प्रमुख माजी आमदार मोहन जोशी,माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, सरचिटणीस अजित दरेकर, सरचिटणीस संजय बालगुडे, सरचिटणीस वीरेंद्र किराड, कमल व्यवहारे, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, नीता राजपूत, राज अंबिके, प्रशांत सुरसे आदी उपस्थित होते. नाना पटोले म्हणाले कि महाराष्ट्रातील वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. पहिल्या दोन्ही टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील. कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजेच कॉंग्रेसची गॅरंटी कार्डला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जनतेने निवडणुक हातात घेतली आहे. उमेदवार कोणीही असू जनता महाविकास आघाडीला मतदान करीत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणात वेगळेच मुद्दे मांडत आहे. ही निवडणुक लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आहे. परंतु ते हिंदु विरुद्ध मुस्लीम अशी करण्याचा प्रयत्न करु लागले आहे. चीन आपला भुभाग बळकावित आहे त्यावर ते काही बोलत नाही. कांदा निर्यातबंदीवर ते बोलत नाही, केवळ गुजरातमधून कांदा निर्यात केला जातो. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले जातात, त्यावर ते काही बोलत नाही. एक रुपयाची पीक विमा योजना फसवी ठरली, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत मिळाली नाही असे अनेक मुद्दे आहेत त्यावर त्यांनी बोलले पाहीजे. केवळ नेहरू-गांधी परिवारावरच ते बोलत आहेत. सोलापुरला त्यांची सभा झाली पण तेथेही ते दुष्काळ, पाणीटंचाई या विषयावर काहीच बोलले नाही. त्यामुळे मोदी यांना मते मागण्याचा अधिकार नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
24.1 ° C
24.1 °
24.1 °
31 %
1.5kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!