34.5 C
New Delhi
Sunday, July 6, 2025
Homeताज्या बातम्यावसंत मोरे यांना कोणते मिळाले चिन्ह !

वसंत मोरे यांना कोणते मिळाले चिन्ह !

पुण्यात चौरंगी लढत होणार

मनसेला जय महाराष्ट्र करत राज ठाकरेंचे कट्टर समर्थक असलेल्या वसंत मोरे यांनी अखेर बहुजन विकास आघाडीची वाट धरली. ‘वंचित’च्या प्रकाश आंबेडकरांनी पुणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर केली आहे. आता मोरे यांना निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी रोडरोलर हे चिन्ह बहाल केले आहे. पुण्यात आता महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद धंगेकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे  आणि एमआयएमचे अनिल सुंडके अशी चौरंगी लढत होणार आहे. पुण्यात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक मोरे यांनी प्रतिष्ठेची केली आहे. जागावाटपाचा तिढा अखेरपर्यंत न सुटल्याने वंचित बहुजन विकासचे प्रकाश आंबेडकर   यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत लोकसभेच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली. त्यानुसार पुणे लोकसभेसाठी आंबेडकर यांनी वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर मोरे यांनी वंचित विकासमध्ये प्रवेश केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
34.5 ° C
34.5 °
34.5 °
54 %
1.4kmh
10 %
Sun
34 °
Mon
35 °
Tue
37 °
Wed
32 °
Thu
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!