28 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeताज्या बातम्याविरोधकांमध्ये पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे 'मुंगेरीलाल'च!

विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे ‘मुंगेरीलाल’च!

राऊत यांनी केला सत्यानाश - गुलाबराव पाटील

चिंचवड– नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, असे पाकिस्तान आणि काँग्रेसला वाटते. विरोधी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे ‘मुंगेरीलाल’च अधिक आहेत, असा टोला शिवसेना नेते व राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला. कट्टर शिवसैनिकांनी वाढविलेल्या पक्षाचा संजय राऊत यांनी सत्यानाश केला, असा आरोपही त्यांनी केला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी चिंचवडच्या चिंचवडे लॉन्स येथे खान्देशवासीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार बारणे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे‌ तसेच बाळासाहेब भागवत, कुणाल वाव्हळकर, श्रीधर वाल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत शेरोशायरी करीत विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला. ते म्हणाले की, मोदी पंतप्रधान होऊ नयेत, असे फक्त पाकिस्तानला आणि देशातील भ्रष्टाचाऱ्यांना वाटते. पण देशातील सर्वसामान्य जनतेला मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटते. त्यामुळे मोदींना दणादण मतदान करा, आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल, ही मोदींची गॅरंटी आहे.

ज्यांच्याकडे 5-10 खासदारही नाहीत, ते इंडिया आघाडीतील नेतेही पंतप्रधान झाल्याचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पहात आहेत, अशी खिल्ली गुलाबराव पाटील यांनी उडवली.

आम्ही रक्ताचं पाणी करून, जीवावर उदार होऊन पक्ष वाढवला, पण ते विनाकारण आम्हालाच बदनाम करीत आहेत. गद्दार, गद्दार म्हणून हिणवत आहेत, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. संजय राऊत यांनी पक्षाचा सत्यानाश केला, असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसने कायम मतांचे राजकारण केले. भांडण लावून लोकांना येडं बनवलं. आता मोदींविषयी चुकीचे चित्र उभे करून मतदारांमध्ये भीती निर्माण करीत आहेत. पण हे आता चालणार नाही. मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात झालेली देशाची प्रगती सर्वांनीच पाहिली आहे. त्यामुळे मोदी हेच पंतप्रधान होणार, हे खुद्द काँग्रेसवालेही मान्य करतात, असे ते म्हणाले.

श्रीरंग बारणे हे दिल्ली हलवून टाकणारे खासदार आहेत. विकास कामांसाठी त्यांनी राज्य शासनाकडे केलेला पाठपुरावा मी स्वतः पाहिला आहे. म्हणून त्यांच्यासाठी खान्देशवासीयांपुढे मतांची झोळी घेऊन आलो आहे, असे त्यांनी सांगितले. खान्देशातील मंडळी तुमच्या भरवशावर पिंपरी-चिंचवडमध्ये पोट भरण्यासाठी आली आहेत. त्यांना सुरक्षितपणे राहता आलं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.

सहा तासांत 3 सभा आणि 250 कि.मी.चा प्रवास

खासदार बारणे यांना गुलाबराव पाटील यांच्या सभेला येण्यासाठी सहा तासांत दोन मोठ्या सभा आणि सुमारे 250 किलोमीटरचा प्रवास, अशी कसरत करावी लागली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी रहाटणी येथे सभा झाली. त्यानंतर खासदार बारणे त्यांच्यासमवेतच हेलिकॉप्टरने पनवेलच्या सभेला गेले व पनवेलची सभा झाल्यानंतर मोटारीने परत चिंचवडला आले.

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आतापर्यंत आपण अनेक आंदोलने केली, केसेस अंगावर घेतल्या. त्याचबरोबर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास केला. त्यामुळे मावळातील मतदार यावेळीही आपल्याला दिल्लीला पाठवेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

संसदेतील शिवसेना पक्षाचे नेते म्हणून खासदार बारणे यांनी केलेल्या कामगिरीची माहिती खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचे बारणे यांचे कसब वाखाणण्यासारखे आहे. पक्षाच्या अन्य खासदारांची कामे करून देण्यासाठी बारणे नेहमीच पुढाकार घेतात. त्यांचे दिल्ली दरबारी खूप वजन आहे. त्यामुळेच त्यांनी मतदारसंघालाही न्याय मिळवून दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

खासदार बारणे यांनाच मतदान करून विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार खान्देशवासीयांनी यावेळी व्यक्त केला. माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. भारत बारी यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
77 %
3.9kmh
100 %
Sun
27 °
Mon
30 °
Tue
34 °
Wed
35 °
Thu
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!