28.1 C
New Delhi
Monday, October 27, 2025
Homeताज्या बातम्याराज्यात चमकले पीसीएमसी

राज्यात चमकले पीसीएमसी

डिजिटल सेवा, स्वच्छता आणि तंत्रस्नेही प्रशासनाच्या जोरावर मिळाले राष्ट्रीय पातळीवर मान्यतेचे यश

मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेला द्वितीय क्रमांक

पिंपरी, — राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा’ उपक्रमाच्या अंतिम मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. (MaharashtraProgress)गुणवत्ता परिषदेने (QCI) केलेल्या मूल्यांकनात महापालिकेला १०० पैकी ८५.७१ गुण मिळाले, तर उल्हासनगर महापालिका प्रथम क्रमांकावर राहिली (८६.२९ गुण).

शहर प्रशासनातील पारदर्शकता, स्मार्ट सेवा (QCIReport2025)आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे पीसीएमसीचे कार्यराज्यभर उठून दिसले. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे आणि विभागांचे कौतुक केले.


प्रमुख मूल्यांकन निकष आणि पीसीएमसीच्या यशाचे स्तंभ:

  • रिअल-टाईम माहिती देणारे सुधारित संकेतस्थळ
  • एआय आधारित तक्रार निवारण प्रणाली
  • जीआयएस आधारित मालमत्ता कर सुधारणा
  • स्मार्ट नागरी सेवा सुलभता
  • स्वच्छता मोहीम आणि जलद प्रतिसाद यंत्रणा
  • गुंतवणूक सुलभता आणि नागरिकांसाठी डिजिटल सेवांचा विस्तार

मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रमात मिळालेलं हे यश आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचा समावेश राज्यातील सर्वोत्तम प्रशासनात झाला, ही मोठी पावती आहे. या यशात अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा मोठा वाटा आहे. यानंतरच्या काळात सेवांना अधिक नागरिकाभिमुख बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
28.1 ° C
28.1 °
28.1 °
47 %
2.1kmh
75 %
Mon
32 °
Tue
30 °
Wed
32 °
Thu
30 °
Fri
31 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!