26.5 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeताज्या बातम्यापुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; लोखंडी सळ्या थेट स्कूलबसमध्ये घुसल्या

पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; लोखंडी सळ्या थेट स्कूलबसमध्ये घुसल्या

मदतनीसासह 8 विद्यार्थी जखमी

Accident: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक दुचाकी अचानक आडवी आल्यामुळे स्कूल बसने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे पाठीमागून लोखंडी सळ्या भरलेल्या पिकअप टेम्पोने स्कूलबसला धडक दिली. यात पिकअपमधील सळ्या बसच्या काचा फोडून आत शिरल्याने आठ विद्यार्थी व मदतनीस जखमी झाले. बुधवारी (आठ ऑक्टोबर) दुपारी सोरतापवाडी येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी उरुळीकांचन पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

विठ्ठल रघुनाथ चौधरी ( वय ७०, रा. वडाची वाडी पेठ) या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडगाव येथील शिक्षण संस्थेची स्कूलबस उरुळीकांचनच्या दिशेने जात होती. सोरतपवाडी येथे अनधिकृतपणे फोडलेल्या दुभाजकामधुन दुचाकी आडवी आल्याने स्कूलबस दुचाकीला धडकली. याच वेळी पाठीमागून लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या पिकअपने (एम. एच. १२ एस. एफ. ५४२०) स्कूल बसला जबर धडक दिली. यामध्ये पिकअपच्या टपावर असलेल्या लोखंडी सळ्या थेट बसच्या पाठीमागील काच फोडून आत शिरल्या. बसमध्ये पहिली ते पाचवीमध्ये शिकणारे विद्यार्थी असल्याने सळया वरील बाजूस लटकल्या होत्या. मात्र, खिडकीच्या काचेच्या तुकड्यांमुळे विद्यार्थी व मदतनीस जखमी झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
26.5 ° C
26.5 °
26.5 °
61 %
2.1kmh
0 %
Thu
30 °
Fri
32 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!