पुणे – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भगवान गडावर दसरा मेळावा साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातून गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील हजारो नागरिक जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिली.
शुक्रवारी चिंचवड येथे श्री भगवान गडावर जाणाऱ्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, रघुनंदन घुले, माजी स्वीकृत सदस्य ॲड. मोरेश्वर शेडगे तसेच ज्ञानेश्वर नागरगोजे, गणेश ढाकणे, कैलास सानप, सचिन थोरवे, शुभम पालवे, भागवत खेडकर, सुभाष दराडे, दीपक नागरगोजे, भागवत मुंडे, भाऊसाहेब कुटे, आण्णासाहेब गरजे, विजय सानप, संजय बडे, विनोद मुंडे, गजानन सोनूने, हनुमंत घुगे, रामदास कावळे, सचिन सानप आदी उपस्थित होते.
या नंतर माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सदाशिव खाडे यांनी सांगितले की, सावरगाव, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथील श्री संत भगवान बाबा यांचे गडावरील स्थळ हे बहुजन समाजाचे श्रद्धास्थान आहे. या गडावर दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी लाखोंच्या संख्येने बहुजन समाजातील बंधू, भगिनी तसेच वारकरी व धार्मिक, सांप्रदायिक क्षेत्रातील भाविक उपस्थित राहत असतात. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातून देखील पाच हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती समन्वयक सदाशिव खाडे यांनी दिली.
श्री भगवान गडावर दसरा मेळावा साठी पिंपरी मधून जाणार हजारो नागरिक – सदाशिव खाडे
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
24.2
°
C
24.2
°
24.2
°
62 %
1.8kmh
0 %
Thu
30
°
Fri
32
°
Sat
33
°
Sun
33
°
Mon
33
°