मुंबई : केंद्रीय मंत्री किरेन रिजेजू यांची महाराष्ट्र भाजपच्या निवडणूक अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने तीन राज्यांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून याबाबतची घोषणा करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली केली आहे. त्याकरिता महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र भाजपच्या निवडणूक अधिकारी पदी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची नियूक्ती करण्यात आली आहे.
तसेच उत्तराखंडसाठी केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा आणि पश्चिम बंगालसाठी माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या संघटनात्मक निवडणूकांमध्ये बूथपासून तर प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतची निवड केली जाते. त्यामुळे या निवडणूकीला विशेष महत्व असून लवकरच निवडणूकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे नाव सध्या चर्चेत आहे.