16.1 C
New Delhi
Wednesday, February 11, 2026
Homeताज्या बातम्यादारूच्या नशेला ‘ब्रेक’!

दारूच्या नशेला ‘ब्रेक’!

आयुक्तांनी तळीरामांना थेट इशारा


पुणे : मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर आता कोणतीही दयामाया केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः पुढाकार घेत तळीरामांची शाळा घेतली. सोमवारी (दि. २) पोलीस मुख्यालयात आयोजित विशेष मार्गदर्शन शिबिरात त्यांनी ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या वाहनचालकांना खडसावले.

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत आयोजित या शिबिरात मद्यप्राशन करून वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई झालेल्या एक हजारांहून अधिक चालकांची उपस्थिती होती. या वेळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्यासह वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

“मद्य पिऊन वाहन चालवल्याने केवळ तुमचाच नव्हे, तर रस्त्यावर चालणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येतो. यापुढे अशा चालकांवर अशी कारवाई केली जाईल, की ती आयुष्यभर लक्षात राहील,” असा कडक इशारा आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. वाहन जप्तीबरोबरच सार्वजनिक जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या कठोर उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांच्या तुलनेत २०२५ मध्ये ड्रंक अँड ड्राइव्हप्रकरणी तब्बल ६ हजार चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही टार्गेटेड मोहिमांद्वारे ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दर आठवड्याला पोलीस मुख्यालयात समुपदेशन शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, ड्रंक ड्रायव्हिंग, रॅश ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे आदी गुन्ह्यांत अडकलेल्या चालकांना या शिबिरांना उपस्थित राहणे बंधनकारक असेल, असेही स्पष्ट करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
16.1 ° C
16.1 °
16.1 °
82 %
0kmh
40 %
Wed
27 °
Thu
26 °
Fri
27 °
Sat
28 °
Sun
26 °

Most Popular

Recent Comments