बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा अजित पवारांनी आपली ‘अजिंक्य’ छाप सोडली आहे.श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जय भवानी माता पॅनलने २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवत विरोधकांना स्पष्ट संदेश दिला.या विजयामुळे ना फक्त कारखान्यावर आपली पकड मजबूत झाली, तर बारामती आणि इंदापूरमधील पवारांचं वर्चस्व पुन्हा अधोरेखित झालं.अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या एकत्रित नेतृत्वाचा हा विजय ठरला.राजकीय मतभेद बाजूला ठेवत ‘विजयासाठी एकत्र’ या धोरणाची ही फलश्रुती मानली जात आहे.श्री छत्रपती बचाव पॅनल आणि त्यांच्या मातब्बर उमेदवारांचा या निवडणुकीत सपशेल पराभव झाला.पक्षीय राजकारणाच्या पलिकडे गेलेली ही निवडणूक आता ‘प्रतिष्ठेची लढत’ होती.विरोधकांचा गुलाल हवेत विरला, आणि जय भवानीचा भगवा झेंडा पुन्हा उंचावला.पवार कुटुंबाचा बारामतीतील गड अजूनही अढळ असल्याचं हे स्पष्ट लक्षण!मतमोजणीच्या पहाटेपर्यंत रंगलेल्या चुरशीला ‘एकतर्फी निकालाने’ पूर्णविराम मिळाला.शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या पाठिंब्याचा हा निर्णायक निकाल मानला जातो.विकास, साखर कारखान्याचं व्यवस्थापन आणि आर्थिक शिस्त हाच कौल दिला गेला.या निकालाने जिल्हा सहकारात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा दबदबा स्पष्ट झाला आहे.‘साखर राजकारणात’ अजितदादांचा हात पुन्हा एकदा वरचढ ठरला आहे.आता पुढे कारखान्याचे आर्थिक सावरणे आणि शेतकऱ्यांचे हित जोपासणे, हीच खरी कसोटी ठरणार आहे.
बारामती, – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, आणि माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री जय भवानी माता पॅनल’ ने अभूतपूर्व विजय संपादन करत सर्वच्या सर्व २१ जागा जिंकून इतिहास रचला. या विजयामुळे विरोधी ‘श्री छत्रपती पॅनल’चा सुपडा साफ झाला. मतमोजणीचा थरार आणि जयघोष -मतमोजणी सोमवारी सकाळी ९ वाजता बारामतीच्या प्रशासकीय भवनात सुरू झाली. बॅलेट पेपरवर मतदान झाल्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया पहाटे ५.३० वाजेपर्यंत चालली. पहाटे निकाल स्पष्ट झाल्यानंतर जय भवानी पॅनलने सर्व २१ जागांवर पाच ते साडेपाच हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. या दणदणीत विजयामुळे पॅनल समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला.🔹 राजकीय समीकरणात महत्त्वाचा टप्पाही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या राजकीय प्रतिष्ठेशी निगडित मानली जात होती. कारखान्याची अडचणीची स्थिती लक्षात घेता, अजित पवार आणि माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी एकत्र येत संयुक्त पॅनल उभं केलं आणि विरोधकांना स्पष्ट संदेश दिला.
👑 विजयी उमेदवारांची यादी (प्रमुख नावे):
- पृथ्वीराज साहेबराव जाचक – 11694 मते
- प्रशांत दराडे – 11180 मते
- अनिल काटे – 11789 मते
- कैलास गावडे – 11832 मते
- डॉ. योगेश पाटील (भटक्या जाती) – 11843 मते
- सुचिता सपकळ (महिला राखीव) – 10384 मते
- मंथन कांबळे (अनु. जाति-जमाती) – 11511 मते