One Call Helpline Launched-
चिंचवड,:- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या आता केवळ एका फोन कॉलवर सुटणार आहेत. आमदार शंकर जगताप यांनी “वन कॉल प्रोब्लेम सोल्व्ह” या संकल्पनेअंतर्गत ‘आपल्या सर्वांची, आपली हेल्पलाईन’ या उपक्रमाची सुरुवात केली. या निमित्ताने हेल्पलाईन क्रमांक ७५७५९८११११ जाहीर करण्यात आला.
या हेल्पलाईनवर नागरिक पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, वीजपुरवठा तसेच शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रश्न नोंदवू शकतात. तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित विभागाशी समन्वय साधून त्वरित कार्यवाही केली जाणार असून, प्रत्येक तक्रारीवर तातडीने फॉलो-अप घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.

आमदार जगताप म्हणाले, “नागरिकांच्या समस्या सोडविणे ही माझी जबाबदारी आहे. लोकांना त्यांच्या छोट्या-मोठ्या अडचणींसाठी कार्यालयीन दारं ठोठावावी लागू नयेत, म्हणून ही हेल्पलाईन सुरू केली आहे. आता फक्त एका कॉलवर प्रत्येक तक्रारीचे निराकरण होईल.”
या उपक्रमामुळे चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळणार असून, ‘१ कॉल – प्रॉब्लेम सॉल्व्ह’ या ब्रीदवाक्यामुळे नागरिकांना सोयीस्कर व जलद सेवा उपलब्ध होणार आहेत.
News TiTle- “One Call Helpline Launched in Chinchwad: Quick Solutions for Citizens’ Issues”